ETV Bharat / state

fire break out in Bhiwandi : भिवंडीत अग्नितांडव! कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग

author img

By

Published : Nov 26, 2022, 10:43 AM IST

कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली ( fire break out in Bhiwandi ) आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात आज सकाळच्या साडे सहा वाजल्याच्या सुमारास घडली आहे.

fire break out in Bhiwandi
कापूर, अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग

ठाणे : कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली ( fire break out in Bhiwandi ) आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात आज सकाळच्या साडे सहा वाजल्याच्या सुमारास घडली आहे.

कापूर, अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग

५ ते ६ बंब घटनास्थळी दाखल : दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या एकूण ५ ते ६ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर या भीषण आगीत कापूर, अगरबत्तीचे तळ अधिक एक मजली असलेले गोदामसह कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात धुराचे लोट पसरले ( fire break out in Camphor incense sticks company ) आहे.

कोणालाही दुखापत नाही : या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी ४ ते ५ तास लागल्याची शक्यता अग्निशाम दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र या आगीत अद्यापपर्यंत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. तर ही आग नेमकी कशी लागली याचे कारणंही समजू शकले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.