ETV Bharat / state

Fire Break Out In Thane : ठाण्यात आग्नीतांडव! तेलाच्या गोदामाला लागलेल्या आगीने 10 गोदामे घेतली विळख्यात

author img

By

Published : Sep 14, 2022, 3:20 PM IST

भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंडमधील खाद्य तेलाच्या गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली Fire Break Out At Oil Warehouse आहे. या आगीत संपूर्ण तेलाच्या गोदामासह औषधांचा साठा असलेले गोदामे असे एकूण १० गोदामे जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान 10 godowns were gutted in the fire झाले आहे.

fire
भीषण आग

ठाणे - भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंडमधील खाद्य तेलाच्या गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली Fire Break Out At Oil Warehouse आहे. या आगीत संपूर्ण तेलाच्या गोदामासह औषधांचा साठा असलेले गोदामे असे एकूण १० गोदामे जळून खाक झाल्याने कोट्यवधींचे नुकसान 10 godowns were gutted in the fire झाले आहे.

ठाण्यात आग्नीतांडव

इमारत कोसळून चाळीचे नुकसान - भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील अरीहंत कंपाऊंड येथील खाद्य तेल Fire Break Out At Oil Warehouse In Thane व औषधे साठविलेल्या एकूण १० गोदामाची इमारती आहे. ही इमारती तळ अधिक एक मजली असून या इमारतीत टोरेंट फार्मास्युटीकल्स कंपनीचे गोदाम आहे. तळमजल्या वर खाद्य तेल तर पाहिल्या मजल्यावर औषध साठा साठविलेला होता. आज पहाटेच्या ६ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली . या आगीत उग्र रूप धारण करीत गोदामातील संपूर्ण साठा जळून जात असतानाच आगीच्या धगी मुळे संपूर्ण इमारत मागील बाजूस कोसळून तेथिल चाळीचे नुकसान झाले आहे .

अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात - आगीच्या घटनेची महिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन तर आगीची व्याप्ती पाहता कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार फायर फायटर गाड्यांनी स्थानिक पाण्याच्या टँकर च्या मदतीने हे आग सात तासांनी आटोक्यात आली आहे सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसून आगीचे कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही. तर आगीच्या घटनेची नोंद नरपोली पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तपास सुरु केला आहे. . सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.