ETV Bharat / state

कल्याणमध्ये साडीच्या दुकानात राडा

author img

By

Published : Aug 24, 2022, 6:58 AM IST

Updated : Aug 24, 2022, 7:26 AM IST

fight in saree shop caught on cctv at kalyan
कल्याणमध्ये साडीच्या दुकानात राडा, घटना सीसीटीव्हीत कैद

दिवसाढवळ्या दुकानात घुसून दुकानातील कपड्यांची नासधूस करुन जबरदस्तीने पैसे पळविल्याने दुकानदार केतन नंदू यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. गणपती जवळ आल्याने दुकानात खरेदीदारांची गर्दी होती. त्यावेळेत टोळक्याने दुकानात गोंधळ घातल्याने अनेक ग्राहक घाबरुन तेथून निघून गेले.

ठाणे कल्याण पश्चिमेतील आग्रा रस्त्यावरील एका साडी विक्री दुकानावर १० जणांच्या टोळीने जोरदार राडा घालून तोडफोड केली. तसेच कामगारांना शिवीगाळ, मारहाण करत गल्ल्यातील चार हजार रुपयाची रोकड घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी दुकान मालकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात राडेबाजांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. मुफीस गांगरेकर, युसुफ गांगरेकर, अमन शेख, कैफ, जहीर, साहिल आणि इतर अनोळखी चार जण अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी भिवंडी तालुक्यातील कोन गावातील रहिवासी आहेत.

खरेदी केलेल्या कपड्याची रक्कम परत मागण्यावरून राडा केतन करसन नंदू ( वय ३९,) रा. चरई, ठाणे) यांचे साडी विक्रीचे दुकान कल्याण पश्चिमेतील जुना आग्रा रस्त्यावरील रणछोडदास निवासात रंगोली साडी सेंटर आहे. केतन नंदू हे रविवारी दुपारच्या सुमारास दुकानात बसले होते. गणेशोत्सव जवळ आल्याने यावेळी ग्राहकांची खरेदीची गर्दी होती. या गर्दीत आरोपी मुफीस गांगरेकर आणि त्यांचे इतर नऊ साथीदार आरडाओरडा करत दुकानात घुसले. आरोपीच्या नातेवाईकांनी रंगोली साडी दुकानातून खरेदी केलेल्या कपड्याची किंमत चार हजार रुपये समोरील कामगारांकडे परत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र एकदा कपडे खरेदी केल्यानंतर पैसे का परत मागता म्हणून दुकान मालक, कामगार आरोपींना प्रश्न करू लागले. यावरुन दुकानात एका वेळी घुसलेल्या मुफीससह इतर नऊ जणांनी आरडाओरडा करुन दुकानात तोडफोड करत कामगारांना धक्काबुक्की केली. एकावेळी नऊ जण अंगावर आल्याने कामगारांना प्रतिसाद करता आला नाही. दुकान मालक केतन हे आरोपींना समजविण्याचे प्रयत्न करत होते. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर दुकानात गोँधळ घालत दुकानातील एका पुतळ्याची मोडतोड करत टोळक्याने दुकानाच्या गल्ल्यातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून पळ काढला.


आरोपींचा शोध सुरू दिवसाढवळ्या दुकानात घुसून दुकानातील कपड्यांची नासधूस करुन जबरदस्तीने पैसे पळविल्याने दुकानदार केतन नंदू यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. गणपती जवळ आल्याने दुकानात खरेदीदारांची गर्दी होती. त्यावेळेत टोळक्याने दुकानात गोंधळ घातल्याने अनेक ग्राहक घाबरुन तेथून निघून गेले.

Last Updated :Aug 24, 2022, 7:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.