ETV Bharat / state

Diwali 2023 : दिवाळे गावाची अनोखी दिवाळी; समुद्रातून मूर्ती शोधून साजरा करतात दिवाळी सण, पाहा व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 7:19 PM IST

Updated : Nov 14, 2023, 10:51 PM IST

Diwali 2023 : बहरीनाथाच्या आगमनाने दिवाळे गावातील (Diwale Village) दिवाळी सणाला सुरुवात होते. कोळी बांधवांच्या परंपरेत दिवाळे गावातील बहरीनाथाच्या यात्रेला विशेष महत्त्व आहे. बहरीनाथाची मूर्ती वर्षभर समुद्रात असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी गावातील शेकडो ग्रामस्थ बोटीच्या सहाय्याने समुद्रात मोठ्या काठीच्या सहाय्याने देवाचा शोध घेतात. मूर्ती सापडल्यावर गावातील ग्रामस्थ देवाची स्थापना करतात.

Diwali 2023
दिवाळे गावाची अनोखी दिवाळी

दिवाळे गावाची अनोखी दिवाळी, पाहा व्हिडिओ

ठाणे Diwali 2023 : नवी मुंबईतल्या एका गावात दिवाळी फारच विशेष आणि अनोखी साजरी केली जाते. या गावाचं नाव देखाल 'दिवाळे गाव' असं आहे. गावातील बहिरी या देवाची मूर्ती समुद्रातून आणली जाते. यासाठी विशेष शोध मोहीम घेतली जाते. शोध मोहिमेमध्ये देवाची मूर्ती मिळाल्यानंतर मोठा जल्लोष साजरा केला जातो. विशेष म्हणजे दिवाळे गावाशेजारील अनेक गावातील लोक या बहिरी देवाच्या मूर्तीच्या शोधासाठी बोटीने समुद्रात जातात. मात्र तरी देखील ही मूर्ती खूप प्रयत्न करुनही लवकर मिळत नसल्याचं गावकरी सांगतात. या गावातीलच नाही तर आसपासच्या गावातील शेकडो बोटी या देवांचा शोध घेण्यासाठी समुद्रात जातात, असंही सांगण्यात येतं.

दिवाळे गावात असे फोडतात फटाके : दिवाळे गावातील तांडेल कुटुंबीयांना अनेक पिढ्यांपासून मिळालेल्या मूर्तीनंतर ती अनोखी पूजा केली जाते. भाऊबीज झाल्यानंतर या मूर्तीचं पुन्हा समुद्रामध्ये विसर्जन केलं जातं. तसंच पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा या देवाच्या शोध मोहिमेची सुरुवात होते. अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे. 'दिवाळे' गावात दिवाळी सणानिमित्त या पूजेनंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. हे फटाके सामान्यतः फोडले जात नाही तर, एकमेकांच्या अंगावर फेकून हे फटाके फोडले जातात. यात कोणी जखमी झालं तरी कोणीही तक्रारी करत नाही. सामान्यतः फटाके फोडताना अनेकांचे कपडे जळणं, जखमा होणं या किरकोळ गोष्टी समजल्या जातात. तसेच दिवाळी दरम्यान या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन देखील केलं जातं.



देव शोधण्याची मोहीम गंभीरपणे : काही वर्षांपूर्वीपासून देव शोधण्याची मोहीम फक्त दिवाळे गावातच सुरू आहे. मात्र आजूबाजूच्या गावांमध्ये या मोहिमेची माहिती मिळाल्यानंतर आता देव शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात चढाओढ होत असते. त्यामुळं काही काळ जोपर्यंत देव मिळत नाही तोपर्यंत अनेक गावातील वातावरण हे गंभीर झाल्याचं पाहायास मिळतं.

हेही वाचा -

  1. Diwali Festival 2023: साईंच्या दरबारी आज मोठ्या थाटात होणार लक्ष्मीपूजन; जाणून घ्या कशा-कशाची होणार पूजा
  2. Diwali 2023 : मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली; यंदा प्रदूषण विरहित फटाक्यांना बाजारात मागणी
  3. Diwali Festival २०२३ : पणती व्यवसायाला उतरती कळा; ऐन दिवाळीत पणतीच्या भट्ट्या बंद
Last Updated : Nov 14, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.