ETV Bharat / state

माझा नैसर्गिक मृत्यू झालाय; मला प्रमाणपत्र द्या.. मृत्यूच्या दाखल्यासाठी आंदोलन

author img

By

Published : Jan 20, 2020, 8:31 PM IST

मुंब्रा भागात असलेल्या काही समाजकंटकांनी माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून डॉक्टरांना त्रास देण्याचे सत्र सुरु केले. त्यामुळे मुंब्रा येथील डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार ठाणे मनपाच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी चक्क कफन बांधून आंदोलन केले.

कफन बांधून आंदोलन करताना नगरसेवक शानू पठाण
कफन बांधून आंदोलन करताना नगरसेवक शानू पठाण

ठाणे - मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांकडून मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. त्यामुळे मृतदेहाला घरात झाकून ठेवत नातलगांना मृत्युचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हा प्रकार ठाणे महानगर पालिकेच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी महासभेच्या पार्श्वभूमीवर चक्क कफन बांधून आंदोलन केले.

कफन बांधून आंदोलन करताना नगरसेवक शानू पठाण

ठाणे महानगर पालिकेची महासभा आज(सोमवार) आयोजित करण्यात आली होती. या महासभेला सुरुवात होण्यापूर्वीच शानू पठाण यांनी हे आंदोलन केले. अंगावर कफन बांधून त्यांनी पालिका मुख्यालयात घोषणाबाजी केली. 'माझा नैसर्गिक मृत्यू झालाय; मला प्रमाणपत्र द्या' असे लिहिलेले कफन त्यांनी अंगावर चढवून घेतले होते.

मुंब्रा भागात असलेल्या काही समाजकंटकांनी माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून डॉक्टरांना त्रास देण्याचे सत्र सुरू केले. त्यामुळे मुंब्रा येथील डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांनाही प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, ज्यांच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो, अशा लोकांनाही मृत्यूचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने मृतदेह घरातच ठेवून डॉक्टरांची शोधाशोध करावी लागत आहे. तर काही वेळा हजारो रुपये मोजून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते.

सोमवारी मुंब्रा येथे खालीमाबी नामक एका वृद्धेचा मृत्यू झाला. मात्र, तिला मृत्यूचा दाखला न देण्यात आल्याने तिचा मृतदेह घरात तसाच ठेवण्यात आला. तर, १२ जानेवारी रोजी विनोद गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते.

हेही वाचा - ठाण्यात रंगला बासरीवादन महोत्सव, 80 बासरीवादक 20 व्हायोलिन वादक सहभागी

येथील डॉक्टर आपण उपचार केले नसल्याने प्रमाणपत्र देऊ शकत नाही, असे सांगत आहेत. मात्र, मुंबइमध्ये उपचार घेणारा माणूस जर मुंब्रा येथे दगावला तर त्यास प्रमाणपत्र कसे मिळणार? त्यामुळे आयुक्त आणि महापौर यांनी तत्काळ निर्णय घेऊन शिवाजी रुग्णालयातील ८ पैकी एका डॉक्टरची तत्काळ मुंब्रा येथे नियुक्ती करुन मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी. या मागणीसाठी आपण हे आंदोलन केले असल्याचे शानू पठाण यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - ठाण्यात इलेक्ट्रिक दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून खाक

Intro:मृत्युच्या प्रमाणपत्रासाठी कफन बांधून शानू पठाण यांचे आंदोलनBody:
मुंब्रा भागात काही समाजकंटकांमुळे डॉक्टरांकडून मृत्युचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. त्यामुळे मृतदेहाला घरात झाकून ठेवत नातलगांना मृत्युचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हा प्रकार ठाणे महानगर पालिकेच्या अनास्थेमुळे होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी महासभेच्या पार्श्वभूमीवर चक्क कफन बांधून आंदोलन केले.
ठाणे महानगर पालिकेची महासभा आज आयोजित करण्यात आली होती. या महासभेला सुरुवात होण्यापूर्वीच शानू पठाण यांनी हे आंदोलन केले. अंगावर कफन बांधून त्यांनी पालिका मुख्यालयात घोषणाबाजी केली. “ माझा नैसर्गिक मृत्यू झालाय; मला प्रमाणपत्र द्या” असे लिहिलेले कफन त्यांनी अंगावर लपेटून घेतले होते.
मुंब्रा भागात असलेल्या काही समाजकंटकांकडून माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करुन डॉक्टरांना त्रास देण्याचे सत्र सुरु केले आहे. त्यामुळे मुंब्रा येथील डॉक्टरांनी नैसर्गिक मृत्यू झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, ज्यांच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो अशा लोकांनाही मृत्युचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने मृतदेह घरातच ठेवून डॉक्टरांची शोधाशोध करावी लागत असते. काही वेळा तर हजारो रुपये मोजून हे प्रमाणपत्र मिळवावे लागते.
सोमवारी मुंब्रा येथे खालीमाबी नामक एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. मात्र, तिला मृत्युचा दाखल न देण्यात आल्याने तिचा मृतदेह घरामध्ये तसाच ठेवण्यात आला आहे. तर, 12 जानेवारी रोजी विनोद गुप्ता या तरुणाचा मृत्यु झाला होता.
मात्र, त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते.येथील डॉक्टर आपण उपचार केले नसल्याने प्रमाणपत्र देऊ शकत नाही, असे सांगत आहेत. मात्र, मुंबइमध्ये उपचार घेणारा माणूस जर मुंब्रा येथे दगावला तर त्यास प्रमाणपत्र कसे मिळणार? त्यामुळे आयुक्त आणि महापौर यांनी तत्काळ निर्णय घेऊन शिवाजी रुग्णालयातील 8 पैकी एका डॉक्टरची तत्काळ मुंब्रा येथे नियुक्ती करुन मृत्युचे प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी आपण हे आंदोलन केले असल्याचे शानू पठाण यांनी सांगितले.
Byte शानू पठान राष्ट्रवादी कोंग्रेस नगरसेवकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.