ETV Bharat / state

CM Visited Kalwa Hospital: मुख्यमंत्र्यांनी कळवा रुग्णालयात घेतला आढावा, आरोग्य सुविधांसाठी 71 कोटींचा निधी देण्याची केली घोषणा

author img

By

Published : Aug 15, 2023, 7:26 AM IST

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. समितीचा अहवाल आल्यावर जर दोषी आढळले तर संबंधितांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

CM Visited Kalwa Hospital
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाला सोमवारी भेट दिली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी विविध सुविधा निर्माण करण्यासाठी 71 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. तसेच मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. रूग्णालयात गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर 13 ऑगस्ट रोजी तब्बल 18 रुग्णांनी आपला जीव गमाविला.

दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन : कळवा रूग्णालयात होणाऱ्या रग्णांच्या मृत्यूचा आढावा घेण्यासाठी सोमवारी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी संपूर्ण वस्तुस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 9 सदस्यांची समिती गठीत केली आहे. त्यांना 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर त्यात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कळवा रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी निधीची कोणती कमतरता भासू देणार नाही.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामान्य नागरिकांचा विश्वास : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर अजूनही सामान्य नागरिकांचा विश्वास आहे. एवढे मृत्यू झाल्यानंतर देखील 91 नवीन रुग्ण येथे भरतॉ झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिले. कळव्यातील रुग्णालयात केवळ 500 खाटा असताना 588 रुग्ण येथे भरती करण्यात आले होते, तरी उरलेल्या 88 रुग्णांना सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सिव्हिल रुग्णालय येथे जवळपास अतिरिक्त तीनशे खाटांची व्यवस्था केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा : तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांच्या समस्यांची माहिती घेतली. त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाची पुनर्बांधणीसाठी सुरू आहे, त्यामुळे कळवा रुग्णालयावर अतिरिक्त भार पडला आहे. या परिस्थितीचा राजकारण न करता सर्वांनीच येथील डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला समजून घेतले पाहिजे, असे देखील त्यांनी सांगितले.


हेही वाचा :

  1. Kalwa Hospital Patient Death Case: कळवा हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे थैमान; अश्रू.. हुंदके आणि टाहो
  2. Ambadas Danve on CM : कळवा रुग्णालयातील मृत्यूची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच; उद्धव ठाकरे असते तर...
  3. Kalwa Hospital Death Incident : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील कळवा रुग्णालय बनले मृत्यूचा सापळा; विरोधक आक्रमक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.