ETV Bharat / state

भिवंडीत अग्नितांडव; रसायनाच्या कारखान्याला भीषण आग

author img

By

Published : Nov 20, 2020, 9:35 PM IST

Updated : Nov 20, 2020, 10:53 PM IST

कंपनीतील साठवून ठेवलेले केमिकलचे ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या ड्रमचे स्फोट होऊन आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग अधिकच वाढत गेली.

chemical factory burning bhiwandi
केमिकल कारखान्याला भीषण आग

ठाणे - भिवंडी तालुक्यातील खोणी गावच्या हद्दीतील एका रसायनाच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीतील साठवून ठेवलेले केमिकलचे ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या ड्रमचे स्फोट होऊन आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग अधिकच वाढत गेली. घटनेची माहिती मिळताच, भिवंडी अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण समजू शकले नाही.

आगीची दृश्ये.

आग विझविण्याचे प्रयत्न सुरू -

भिवंडीनजीक असलेल्या खोणीगावातील शेलारमीठ पाडा, येथील आसरा हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका केमिकलच्या कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशनदलाचे जवान आणि दोन फायर वाहन, एक वॉटर टँकर सहीत उपस्थित आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - सिरमची कोरोनावरील लस 'या' वर्षापर्यंत सर्व भारतीयांना मिळणार

या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे भिवंडी अग्निमशन दलाच्या कार्यलयातुन सांगण्यात आले. तर भीषण आग अध्यापही मोठ्या प्रमाणात फोफावली असून शेजारी असलेल्या यंत्रमाग कारखानेही या आगीच्या विळख्यात येणार नाही याची खबरदारी घेऊन घटनस्थळी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

Last Updated : Nov 20, 2020, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.