ETV Bharat / state

Caste Discrimination In School : शाळेमध्ये शिक्षकांकडून दलित विद्यार्थ्यांचा जातीय छळ, शिक्षकांविरोधात पालकांचे जोरदार आंदोलन

author img

By

Published : Dec 8, 2022, 7:56 PM IST

दलित विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत न बसवता जमिनीवर बसविणे, त्यांना वारंवार शिक्षा करणे, जातीवाचक शब्दात अपमान करणे आदी प्रकार केले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. (Caste harassment of Dalit students by teachers). आंदोलनानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी फुलसुंदर यांनी आंदोलकांची भेट घेऊन माफी मागितली. तसेच संबधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (caste discrimination in thane school).

Etv Bharat
Etv Bharat

ठाणे : वाल्मिकी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जातीय छळ केला जात असल्याचा आरोप करीत (Caste harassment of Dalit students by teachers) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने रामनगर येथील साधना शाळेमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संबधित शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (caste discrimination in thane school).

शिक्षकांविरोधात पालकांचे जोरदार आंदोलन

काय आहे प्रकरण? : रोड नं 28, रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे येथे साधना विद्यालय नामक शाळा आहे. या शाळेत रामनगर भागातील वाल्मिकी समाजाचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत न बसवता जमिनीवर बसविणे, त्यांना वारंवार शिक्षा करणे, जातीवाचक शब्दात अपमान करणे आदी प्रकार केले जात असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्याकडे काही पालकांनी केल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा केली असता, या शाळेतील एक शिक्षिका जाणीवपूर्वक दलित विद्यार्थ्यांना त्रास देत असून पालकांना भेटायला बोलावून “तुमच्या जातीची मुले शिक्षण घेतातच कशाला? त्यांना इतर मुलांप्रमाणे उनाडक्या करु देत; त्यांची शिक्षण घेण्याची लायकी नाही”, अशा पद्धतीची विधाने केेल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर प्रफुल्ल कांबळे यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, शाळा प्रशासनाने त्यांना भेटही नाकारली. त्यामुळे या शिक्षिकेवर कारवाई करावी, तिच्यावर अट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी महिलाध्यक्ष सुजाता घाग यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

संबधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन : यावेळी प्रफुल्ल कांबळे म्हणाले की, शाळा हे ज्ञानदान करण्याचे माध्यम आहे. मात्र या शाळेत ज्ञानदान करण्याऐवजी चक्क विषमता पसरविण्याचे काम केले जात आहे. हे काम अत्यंत चुकीचे असून अशा पद्धतीने संविधानातीळ समतेच्या तत्वाला हरताळ फासणार्‍या शिक्षिकेला शिक्षणाच्या क्षेत्रात राहण्याचा अधिकार नाही. या शिक्षिकेला तत्काळ बडतर्फ करुन तिला अटक करावी. अन्यथा, आम्ही हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करु. यावेळेस शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी फुलसुंदर यांनी आंदोलकांची भेट घेऊन माफी मागितली. तसेच संबधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात रमेश दोडके, समीर नेटके, फिरोज पठाण, विक्रांत घाग, अनिता मोटे, कांता गजमल, फुलबानो पटेल यांच्यासह अनेक विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.