ETV Bharat / state

Thane Crime प्रशांत जाधव मारहाणीचा तपास गुन्हे शाखेकडे द्या, भाजपच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

author img

By

Published : Jan 2, 2023, 5:51 PM IST

राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता ( BJP vs Shinde Faction Dispute In Thane ) आहे. मात्र ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने भाजप पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही गटातील वाद विकोपाला पोहोचणार असे दिसत आहे. भाजपचे वागळे इस्टेटमधील प्रशांत जाधव ( Prashant Jadhav Beaten Case ) यांच्यावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केला. त्यामुळे या प्रकरणात कारावाई होत नसल्याचा आरोप भाजपने केला. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग ( BJP Demand On Thane CP ) करण्याची मागणीही भाजपने पोलीस आयुक्तांकडे ( Police Commissioner Jai Jeet Singh) केली आहे.

Prashant Jadhav Beaten Case Thane
भाजपच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांची भेट

ठाणे - शिंदे आणि भाजप गटाचा वाद ( BJP vs Shinde Faction Dispute In Thane ) विकोपाला पोहोचला आहे. भाजपचे वागळे इस्टेटमधील ( Wagle Estate Thane ) पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला ( Prashant Jadhav Beaten Case ) झाला होता. या हल्ल्यातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे ( Thane Crime Branch ) सोपवावा, अशी मागणी भाजपने ( BJP Demand On Thane CP ) केली आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग ( Police Commissioner Jai Jeet Singh ) यांची भेट घेतली. दरम्यान दोन्ही पक्षाकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

भाजप आमदाराचे पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजपचे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव ( Prashant Jadhav Beaten Case ) यांच्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक यांच्या सांगण्यावरून भ्याड हल्ला ( BJP vs Shinde Faction Dispute In Thane ) करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्यात जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. शनिवारी सकाळी भाजपच्या आमदारांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या ( BJP Demand On Thane CP ) आंदोलन केले. मात्र वागळे इस्टेट पोलीस तपासाला सहकार्य करत नसल्याचा आरोप यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. वागळे पोलिसांच्या पक्षपाती वर्तनाची चौकशी करावी, या मागणीसाठी पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची आमदार संजय केळकर व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह शिष्ठमंडळाने भेट घेतली.

कारवाईचे पोलीस आयुक्तांचे आश्वासन राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत असून ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्याला जबर मारहाण होत आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये या वादावरून येत्या काळात पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मारहाण करणाऱ्या गुन्हेगावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप आमदारांनी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्यावर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी ( Police Commissioner Jai Jeet Singh ) दिल्याचे यावेळी भाजपच्या शिष्ठमंडळाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.