ETV Bharat / state

स्पोर्ट बाईकची कंटेनरला जोरदार धडक; अल्पवीयन मुलगा ठार

author img

By

Published : Apr 21, 2022, 8:17 PM IST

सद्या शहराध्ये बाईक सुसाट वेगात चालवण्याचे तरुणांचे फॅड बनले असून त्यामुळे अपघाताच्या घटनात मोठी वाढ होत आहे. पोलिसांनी लक्ष देऊन सुसाट वेगात चालवाणाऱ्या बाईकस्वरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

a minor boy was killed when sports bike hit container in bhiwandi
स्पोर्ट बाईकची कंटेनरला जोरदार धडक

भिवंडी (ठाणे) - भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथील डॉ. जेपी अब्दुल कलाम उड्डाणंपुलावर आज पहाटेच्या सुमारास दोन अल्पवयीन मित्र भरधाव वेगाने स्पोर्ट बाईक चालवत असतानाच कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये बाईकवरील एकजण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. जाहिद शेख (वय १४) हा जागीच ठार झाला तर कैफ दिनशा सिद्दीकी (वय १३) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुबंईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरधाव वेगाने नियंत्रण सुटल्याने अपघात - दोघेही अल्पवयीन मित्र आज पहाटे १ वाजल्याच्या सुमारास भिवंडीतील मिल्लतनगरमधून वंजारपट्टी नाका जाण्यासाठी बाईकवरून निघाले होते. त्यावेळी त्यांची बाईक भरधाव वेगाने डॉ. जेपी अब्दुल कलाम उड्डाणंपुलावर येताच बाईकस्वराचे नियंत्रण सुटले आणि बाईकने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच निजामपूरा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांच्या मदतीने दोघांना गंभीर जखमी अस्वस्थेत सिराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र जाहिदचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर कैफ गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाईक सुसाट वेगात चालवण्याचे तरुणांचे फॅड - विशेष म्हणजे सद्या शहराध्ये बाईक सुसाट वेगात चालवण्याचे तरुणांचे फॅड बनले असून त्यामुळे अपघाताच्या घटनात मोठी वाढ होत आहे. पोलिसांनी लक्ष देऊन सुसाट वेगात चालवाणाऱ्या बाईकस्वरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.