ETV Bharat / state

विद्युत शॉक लागल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 10:51 PM IST

Electric shock : ठाण्यातील सावरकर नगर, पाटीलवाडी परिसरातील सिद्धिविनायक चाळीत वीजेचा धक्का लागून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आलोक चकवे असं मृत मुलाचं नाव आहे.

Electric shock
Electric shock

ठाणे Electric shock : वीर सावरकरनगर परिसरात असलेल्या सिद्धिविनायक चाळीत शनिवारी वीजेचा धक्का लागून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आलोक चकवे (11) असं मृत मुलाचं नाव आहे.

लोखंडी शिडीत उतरला विद्युत प्रवाह : आलोक चकवे शनिवारी दुपारी घराबाहेर असताना त्यांचा हात घराजवळील लोखंडी शिडीला लागला. या शिडीत विद्युत प्रवाह उतल्यानं त्याला वीजेचा धक्का बसला. त्यानंतर 'तो' जागीच बेशुद्ध पडला. घराबाहेरील लोखंडी शिडीजवळील विद्युत तारा निकामी झाल्यानं विजेचा धक्का बसल्याचा अंदाज रहिवाशांकडून वर्तविला जात आहे. विजेचा धक्का बसताच आलोकला ठाणे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. वीजेचा धक्का नेमका कसा लागला, याचा तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत.

एका महिलेलाही वीजेचा धक्का : ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटीलवाडी, सावरकर नगर परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी घराची शिडी एमएसईबी DP जवळ आहे. तर अनेक उघड्या विद्युत केबल डीपीजवळ आहे. त्यामुळं वीज घराच्या लोखंडी शिडीत उतरली होती, असा रहिवाशांचा आरोप आहे. शिडीला स्पर्श करताच आलोकला विजेचा धक्का बसला. दरम्यान, त्याचवेळी एका महिलेलाही विजेचा धक्का बसला, मात्र तिनं लगेच शिडी सोडल्यानं ती वाचली. अलोक शिडी घट्ट चिटकल्यानं त्याचा दुर्दैवी मुत्यू झाला. 'या' संदर्भात संबंधित वीज अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीसांच्या वजनानं बाबरी पडली असावी; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
  2. "कृषीप्रधान भारताला कृषीमंत्रीच नाही", शरद पवारांचा शेतकरी आक्रोश मोर्चात हल्लाबोल
  3. 'इंडिया आघाडी'च्या भीतीनं भाजपाला पोटदुखी - काँग्रेस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.