ETV Bharat / state

Childerns Day 2022 : महिलेने टोल नाक्यावर दिला जुळ्या बाळांना जन्म, टोल कर्मचाऱ्यांनी केली मदत

author img

By

Published : Nov 15, 2022, 12:15 PM IST

सोलापूर पुणे महामार्गावरील ( Solapur Pune Highway ) पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीच्या सावळेश्वर टोल नाक्यावर ( Savleshwar Toll Gate ) बाल दिनाच्या ( Childerns Day 2022 ) मुहूर्तावर एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला.

Woman gave birth to twin babies
महिलेने टोल नाक्यावर दिला जुळ्या बाळांना जन्म

सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील ( Solapur Pune Highway ) पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीच्या सावळेश्वर टोल नाक्यावरील ( Savleshwar Toll Gate ) कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान आणि मदत यामुळे बाल दिनाच्या मुहूर्तावर ( Childerns Day 2022 ) सोमवारी दुपारी एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला. रामदेवी गोविंद कुमार वय 24 राहणार टेंभुर्णी, सोलापूर ही उत्तर प्रदेशातील महिला टेंभुर्णी मध्ये पेपर मिलमध्ये काम करत आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलेला व तिच्या बाळांना जीवदान मिळाले.


प्रसूती साठी महिलेला टेम्भुर्णीहुन सोलापूरला घेऊन जात होते : संबंधित महिला दोन सहकारी महिलांसह प्रसूती साठी रिक्षातून टेंभुर्णीहून सोलापूरकडे जात होती. अचानक सावळेश्वर टोल नाक्यावर आल्यावर त्यांची रिक्षा बंद पडली. त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना ही माहिती देताच रूट ऑपरेशन टीम मधील मंजुनाथ पुजारी, पवन प्रशांत सिंह, अभिषेक पांडे, रोहित पांडे, तसेच प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश साही यांनी सर्व यंत्रणा अलर्ट केली. पॅरामेडिकल स्टाफ चे सुदर्शन एरनाळे यांनी प्रयत्न अॅम्बुलन्स मध्येच त्या गर्भवती महिलेने एका मुलास जन्म दिला.

दुसऱ्या बाळाला सिव्हिल मध्ये जन्म दिला : महिलेने एका बाळाला टोल नाक्यावरच जन्म दिला. अजून एक गर्भ असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी ताबडतोब अ‍ॅम्बुलन्सद्वारे चालक अमर जाधव यांनी त्या महिलेस सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या महिलेने आणखी एका मुलीस जन्म दिला. सोमवारी बालदिन सर्वत्र साजरा होत असताना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी एका महिलेला तत्परतेने मदत केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.