ETV Bharat / state

Solapur Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला; सोलापुरात रेलरोको

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 7:05 PM IST

Maratha Reservation Protest
सोलापूरात रेलरोको करून केली आरक्षणाची मागणी केली

Solapur Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. ठिकठिकाणी रास्तारोको केला जात आहे. अशातच सोलापुरात मराठा संघटनेकडून रेल्वे रोको (Rail Roko Andolan) करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे मराठा बांधव उपस्थित होते.

सोलापुरात रेल्वे रोको करण्यात आली

सोलापूर Solapur Maratha Reservation : सोलापूर शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीचा उद्रेक पाहावयास मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर जाऊन मराठा आरक्षणासाठी रेल्वे रोको आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी रेल्वे रोको करत असल्याचं मराठा बांधवानी सांगितलं. मालवाहतूक करणारी रेल्वे अचानकपणे रोखून जोरदार घोषणाबाजी करण्यात (Rail Roko Andolan) आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) राम जाधव, प्रकाश भोसलेसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रेल्वे रोको करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे (Faujdar Chavadi Police Station) पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिदसह पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.

सोलापुरात केलं रेल्वे रोको : मराठा आरक्षण आंदोलनाची धग सोलापूर शहर व जिल्ह्यात दिसून येत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शहराजवळ असलेल्या शेटे वस्तीजवळ असलेल्या रेल्वे रुळावर अचानकपणे आंदोलन करण्यास सुरुवात केली. मालवाहतूक रेल्वे त्या ठिकाणाहून जात असताना, मराठा समाज बांधवानी रेल्वे मालवाहतूक ट्रेन रोखून धरली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली.

लोहमार्ग पोलीस व आरपीएफ पोलिसांची तारांबळ : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणाची मागणी करत रेल्वे रोखून धरण्यात आली होती. मराठा आरक्षण हा विषय फक्त राज्यापुरता न राहता केंद्र शासनाने देखील याची दखल घेतली पाहिजे. रेल्वे वाहतूक रोखल्याने लोहमार्ग पोलीस, सोलापूर पोलीस (Solapur Police) आरपीएफ यांची तारांबळ उडाली होती. तिन्ही दलाचे पोलीस अधिकारी येऊन आंदोलकाना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटलांची माहिती
  2. Uddhav Thackeray On Maratha Reservation : संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा अन्यथा खासदारांनी राजीनामे द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन
  3. Maratha Reservation : मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.