ETV Bharat / state

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं राज्यात वातावरण तापलं आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केलीय. त्यावर भाजपानं ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिलंय.

Maratha Reservation
Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 5:02 PM IST

मुंबई Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची सुरू आहे. काल मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अशा स्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या प्रचारासाठी रायपूरला गेले होते. त्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावर टीका केली. त्यावर भाजपाच्या प्रादेशिक ट्विटर अकाऊंटवरून या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

  • बाप रुग्णालयात असताना पोरगा लंडन मध्ये काय करत होता ते उद्धव यांनी आधी सांगावे. मग देवेंद्रजींना विचारावे की, बाहेर प्रचारासाठी का गेलात?

    मुंबई बुडत असताना बाळासाहेबांना होडीत सोडून स्वतः फाईव स्टारमध्ये ते काय करत होते ते उद्धव यांनी आधी सांगावे मगच देवेंद्रजींना प्रश्न…

    — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उद्धव ठाकरेंचा आरोप : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून आता या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे. दरम्यान, राज्यात अनेक अप्रिय घटना घडत असून गृहमंत्रालयाला जाणीव नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाच्या विधानसभा प्रचारासाठी रायपूरला होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने त्रस्त असल्यानं काल झालेल्या मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. भाजपाच्या प्रचारामुळंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अशा परिस्थितीत रायपूरला गेल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या आरोपाला भाजपानं त्यांच्या प्रादेशिक ट्विटर X हँडलवरून प्रत्युत्तर दिलं आहे.

चोराच्या उलट्या बोंबा : X हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये भाजपांनं म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घालवलंय. उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचं आरक्षण घालवलं नसतं, तर आज आंदोलनाची वेळ आली नसती. आता उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारताय. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! तसंच, वडील हॉस्पिटलमध्ये असताना पोरगा लंडनमध्ये काय करत होते? हे उद्धव ठाकरेंनी आधी सांगावं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारावा असं भाजपानं ट्विटरवर म्हटलं आहे.

अजून काही सांगायचे का? : मुंबई बुडत असताना फाइव्ह स्टार हाॅटेलमध्ये उद्धव ठाकरे काय करत होते? त्यांनी हे आगोदर सागावं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवावी, असंही पुढं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : शिंदे गटाला आणखी एक धक्का; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आणखी एका आमदाराचा राजीनामा
  2. Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांकडून मराठा समाजाला शांततेचं आवाहन; म्हणाले, आम्ही अर्धवट आरक्षण घेणार...
  3. Maratha Reservation Live Updates : 'आम्ही जातो आमच्या गावा.. आमचा रामराम घ्यावा' असं लिहित मराठा तरुणाची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.