ETV Bharat / state

Solapur Crime News: आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन युवकांना बेदम मारहाण; व्हिडीओ चित्रीकरण करून केला सोशल मीडियावर अपलोड

author img

By

Published : Jun 21, 2023, 10:26 AM IST

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन युवकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचे व्हिडीओ चित्रीकरण तयार सोशल मीडियावर अपलोड केल्याने खळबळ उडाली आहे.

Solapur Crime News
तीन युवकांना बेदम मारहाण
व्हाट्सअप स्टेटसवरून युवकांना मारहाण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात तीन युवकांनी व्हाटसप स्टेटस ठेवले होते. त्या व्हाटसप स्टेटस वरून दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने स्टेटस ठेवलेल्या तिन्ही युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाणीची घटना कडबगाव (ता अक्कलकोट) येथे 10 जून 2023 रोजी घडली होती. कडबगाव येथे मारहाण करून तिन्ही युवकांना अक्कलकोट शहरात आणून पुन्हा मारहाण करण्यात आली. हे वेदनादायक व्हिडीओ वाऱ्यासारखे सोशल मीडियावर पसरले.

कोणी सोशल मीडियावर समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस तक्रार करा, कायदा हातात घेऊन पुन्हा दोन समाजात तेढ कशाला निर्माण करता.- सिद्धाराम म्हेत्रे

घटनेचा निषेध : हे व्हिडीओ पाहून अक्कलकोट तालुक्यातील सर्व समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध केला. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामार्फत सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन मंगळवारी रात्री उशिरा निवेदन दिले. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी माध्यमांना माहिती देताना या सुरवातीला या मारहाणीचा निषेध केला. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपींचा शोध घेत संबंधित दोषींवर कठोर शासन करा, अशी मागणी केली आहे.

मारहाण करून व्हिडीओ रिकॉर्डिंग : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात कडबगाव येथील तीन युवकांनी व्हाटसप स्टेटस ठेवले होते. त्याच गावातील इतर समाजाच्या युवकांनी हे व्हाट्सअप स्टेटस पाहिले. त्यावरून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. व्हाटसप स्टेटस ठेवून धार्मिक भावना दुखवाणाऱ्यान युवकांना धडा शिकवायचा आहे, असे सांगून आणखीन काही तरुणांना अक्कलकोट शहरातून बोलावून घेतले.

घरी जाऊन बेदम मारहाण : 10 जून 2023 रोजी दुपारी व्हाटसप स्टेटस ठेवणाऱ्या तिन्ही युवकांना कडबगाव येथील त्यांच्या घरी जाऊन बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील तयार केला. त्या युवकांना चारचाकी वाहनांत बसवून अक्कलकोट शहरात आणले. मुख्य चौकात पुन्हा मारहाण करून त्याचे चित्रीकरण केले. हे व्हिडीओ रिकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहे. दहा दिवसांनंतर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'अक्कलकोट पॅटर्न' इन्स्टाग्रामवर संदेश : अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथील युवकांना मारहाण करतानाच व्हिडीओ 20 जून पासून इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात वायरल केला आहे. व्हाट्सअप स्टेटसद्वारे किंवा आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांचा अक्कलकोट पॅटर्न करू, अशी धमकी काही समाजकंटकांनी दिली आहे. 'कराल का नाद परत' असेही मजकूर सोशल मीडियावर वायरल झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मतदार संघात ही घटना घडली आहे.

हेही वाचा :

  1. Amravati Crime News: विवाहितेचे लैंगिक शोषण; फेसबुकवरून दिली ३५ तुकडे करण्याची धमकी
  2. Nanded Crime : नांदेडमध्ये सशस्त्र जमावाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, 6 जण जखमी; गोरक्षक असल्याचा ग्रामस्थांचा दावा
  3. Pune Crime News: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच; दुसऱ्या दिवशी तळजाई परिसरात 30 गाड्या फोडल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.