ETV Bharat / state

बार्शी येथील वांगरवाडीत चोरट्याने केला चिमुकल्याचा गळा आवळून खून

author img

By

Published : Aug 23, 2020, 12:25 PM IST

वांगरवाडी (बार्शी) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तुपे कुटुंबाचे घर आहे. अश्विनी तुपे यांचे पती ट्रक चालक असून ते शनिवारी बाहेर गावी गेले होते. सार्थकला पाळण्यात झोपवून अश्विनी घरकाम करत होत्या. अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी पाळण्याकडे धाव घेतली. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती मोबाईल चार्जरने बाळाचा गळा आवळत होता.

Baby
बाळ

सोलापूर - शनिवारी दुपारी एका चोराने घरात घुसून 9 महिन्याच्या चिमुकल्याचा मोबाईल चार्जरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. सार्थक स्वानंद तुपे असे त्या नऊ महिन्याच्या बाळाचे नाव आहे. चोरट्याने बाळाच्या आईचेही हात-पाय बांधून मंगळसूत्र ओरबाडून नेले. बार्शी तालुक्यातील वांगरवाडी गावात ही घटना घडली.

चोरट्याने केला चिमुकल्याचा गळा आवळून खून

वांगरवाडी(बार्शी) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तुपे कुटुंबाचे घर आहे. अश्विनी तुपे यांचे पती ट्रक चालक असून ते शनिवारी बाहेर गावी गेले होते. सार्थकला पाळण्यात झोपवून अश्विनी घरकाम करत होत्या. अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी पाळण्याकडे धाव घेतली. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती मोबाईल चार्जरने बाळाचा गळा आवळत होता. अश्विनी तुपे यांनी त्या व्यक्तीकडे बाळाला सोडण्याची विनंती केली. त्यावेळी चोरट्याने बाळाला जमिनीवर फेकले आणि बाळाच्या आईचे हात-पाय बांधून तोंडाला बांधले. त्यानंतर अश्विनी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून तो पसार झाला.

बाळाचे चुलते आनंद तुपे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, बार्शी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जयप्रकाश हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.