ETV Bharat / state

Telangana Assembly Elections : भाजपा नेत्यांचं डिपॉझिट होणार जप्त; मुख्यमंत्री KCR तिसऱ्यांदा रचणार इतिहास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 9:27 PM IST

Telangana Assembly Elections : के. चंद्रशेखर राव तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील, असा दावा के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांनी केला आहे. त्या रविवारी सोलापुरात बोलत होत्या. तेलंगाणात केसीआर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन दक्षिण भारतात इतिहास रचतील, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Telangana Assembly Elections
Telangana Assembly Elections

आमदार के. कविता यांची पत्रकार परिषद

सोलापूर : Telangana Assembly Elections : केसीआर यांच्या कन्या आमदार के. कविता यांनी नवरात्रोत्सवात ब्रतुकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. रविवारी दुपारी के. कविता ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. तेलंगाणाच्या आमदार के. कविता या माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या 105 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. तेलंगाणा राज्यात बीआरएस पक्ष चांगली लढत देईल. भाजपानं यादी जाहीर केली तरी, बीआरएस पक्षाला काहीही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार के. कविता यांनी दिली आहे.

केसीआर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन इतिहास रचतील : तेलंगाणा राज्यात के. चंद्रशेखर राव गेल्या दोनवेळेपासून मुख्यमंत्री आहेत. बीआरएस पक्ष दक्षिण भारतात इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. यावेळी देखील के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होतील, असा विश्वास कविता यांनी व्यक्त केला. केसीआर दक्षिण भारतात नवा इतिहास घडवतील, अशी अशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. भाजपा असो किंवा काँग्रेस, बीआरएस पक्षाला जनतेचा पाठिंबा आहे. टीव्हीवर आलेल्या ओपिनियनवर आमचा विश्वास नाही. आम्ही जनतेच्या ओपिनियन पोलवर विश्वास ठेवतो, असं कविता यांनी म्हटलं आहे.

उत्सवात आमदार कविता रमल्या : तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आमदार कविता ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. शहरातील पूर्व भागातील तेलुगु भाषिक समाजाचा आनंद उत्सव म्हणून हा उत्सव ओळखला जातो. नवरात्रीनिमित्त हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेलंगाणा प्रांतातील महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या अष्टमीपर्यंत साजरा करतात. हळदीनं गौरीदेवी बनवन निसर्गातील विविध रंगी फुले आणतात. फुलांचा गोपुर बनवून पारंपरिक लोकगीते यावेळी म्हणतात.


हेही वाचा -

  1. Assembly Elections 2023 Dates : पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, कोणत्या राज्यात कधी मतदान, वाचा सविस्तर
  2. Assembly Elections 2023 : एमपीसह छत्तीसगडमध्ये विजय निश्‍चित, राजस्थानमध्ये जोरदार लढत, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
  3. KCR Lok Sabha Contest : बीआरएसची महाराष्ट्रावर स्वारी; मराठवाड्यातून केसीआर लढवणार लोकसभा निवडणूक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.