ETV Bharat / state

हैदराबाद-उन्नाव नाही सोलापुरात, मध्यप्रदेशच्या सुखरुप गुडियाची कहाणी

author img

By

Published : Dec 15, 2019, 9:50 PM IST

Updated : Dec 15, 2019, 11:22 PM IST

तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेली एक पंधरा वर्षांची मुलगी. अनोळखी शहरात वाट चुकली होती. तिला पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या सुपूर्द केली.

मुलीला तिच्या आई-वडीलांना सुपूर्द करताना पोलीस
मुलीला तिच्या आई-वडिलांना सुपूर्द करताना पोलीस

सोलापूर - तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेली एक पंधरा वर्षांची मुलगी. अनोळखी शहरात वाट चुकली. तिचा गरीब भटक्या आई-बापांशी संपर्क तुटलेला असताना सोलापूर शहर पोलिसांच्या सतर्कता आणि माणुसकीमुळे कम्युनिटी पोलिसिंगचा नवा अध्याय अनुभवायला मिळाला. हैदराबाद आणि उन्नावसारख्या सामाजिक विकृतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात निर्भया नाही तर एका सुरक्षित गुडियाची कहाणी पाहायला मिळाली.

माहिती देताना मुलीचे वडील व पोलीस अधिकारी


मध्य प्रदेशातील गऱ्हाकोटा येथील रंगा मल्होत्रा आणि त्याची पत्नी एटणी हे गरिब दाम्पत्य साडी विकण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. जिथे जागा मिळेल तिथे त्यांचे घर असायचे आणि त्याच परिसरात फिरस्ती साडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय करत होते. या व्यवसायाच्या निमित्ताने आई-वडील उमरगा येथे फिरतीवर गेल्यावर त्यांची 15 वर्षांची मुलगी आजीबरोबर तुळजापूरला गेली आणि भर दुपारी वाट चुकली. आई-वडिलांच्या शोधात ती सोलापुरात पोहोचली. वाट मिळेल तिकडे ती फिरत होती. तिच्यासाठी शहर आणि शहरातील माणसेसुद्धा नवीन होती. दिवस मावळतीला गेल्यावर ती जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुपाभवानी मंदिर परिसरात फिरत असताना पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या गुडीयाला रडू फुटले. तिने आपण भरकटल्याचे सांगितले.

हेही वाचा - सोलापुरात 'या' ठिकाणी दररोज भरते कावळ्यांची जत्रा, प्रेमाचा घास भरवितात 'कावळे मामा'

तेव्हा सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महिला व बालसुरक्षा संदर्भात नियुक्त केलेल्या पथकाने या मुलीचा ताबा घेतला. तिला बालगृहात ठेवून या मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेतला. तर दुसरीकडे तिचे आई-वडिलही उमरगा, तुळजापूर, सोलापूर, उस्मानाबाद या शहरात तिला शोधत होते. पायपीट सुरु असतानाच तीन दिवसानंतर सोलापूर शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातील सारंग जिल्ह्यातील गऱ्हाकोटा पोलिसांच्या मदतीने तिच्या वडिलांशी संपर्क केला. आता ही गुडिया तिच्या पालकांच्या स्वाधीन केली. तेंव्हा तिच्या आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि महाराष्ट्र पोलिसांचे मनोमन आभार मानले.

वरवर पाहता ही घटना सहज साधी वाटत असली तरी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत गुन्हा घडला की पोलिसांकडे बोट करणाऱ्या व्यवस्थेत सोलापूर शहर पोलिसांनी बजावलेली भूमिका नक्कीच कौतुकास पात्र आहे.

हेही वाचा - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अरण येथे तिहेरी अपघात, तीन ठार

Intro:सोलापूर : तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवलेली एक पंधरा वर्षांची मुलगी....पर मुलखात वाट चुकली... अन तिचा गरीब भटक्या आईबापांशी संपर्क तुटलेला असताना सोलापूर शहर पोलिसांच्या सतर्क अन माणुसकीच्या भूमिकेमुळं कम्युनिटी पोलिसिंगचा नवा अद्याय अनुभवायला मिळालाय.
होय... हैद्राबाद आणि उन्नावसारख्या सामाजिक विकृतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात निर्भया नाही तर एका सुरक्षित गुडीयाची कहाणी पहायला मिळालीय.


Body:मध्य प्रदेशातल्या गऱ्हाकोटा येथील रंगा मल्होत्रा आणि त्याची पत्नी एटणी हे गरिब दाम्पत्य साडी विकण्यासाठी महाराष्ट्रात आलेलं...जिथं म्हणून जागा मिळेल तिथं त्यांचं घर..अन त्याच परिसरांत फिरस्ती साडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय.... या व्यवसायाच्या निमित्ताने आई-वडील उमरगा येथे फिरतीवर गेल्यावर त्यांची 15 वर्षांची मुलगी आजीबरोबर तुळजापूरला गेली अन भर दुपारी वाट चुकली...भरकटली.आई-वडिलांच्या शोधात ती सोलापुरात पोहचली...वाट मिळेल तिकडे ती फिरत होती.तिच्यासाठी शहर आणि इथली माणसंसुद्धा नवीन होती...दिवस मावळतीला गेल्यावर ती जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुपाभवानी मंदिर परिसरात फिरत असताना पोलिसांच्या नजरेस पडली.पोलिसांनी चौकशी केल्यावर त्या गुडीयाला रडू फुटलं... तिनं आपण भरक्तल्याचं सांगितलं तेंव्हा सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महिला व बालसुरक्षा संदर्भात नियुक्त केलेल्या पथकानं या मुलीचा ताबा घेतला.तिला बालगृहात ठेवून या मुलीच्या आई वडिलांचा शोध घेतला.तर दुसरीकडे तिचे आई-वडीलही उमरगा,तुळजापूर,सोलापूर,उस्मानाबाद या शहरात तिला शोधत होते.पायपीट सुरु असतानाच तीन दिवसानंतर सोलापूर शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातील सारंग जिल्ह्यातील गऱ्हाकोटा पोलीसांच्या मदतीने तिच्या वडिलांशी संपर्क केला...आता ही गुडीया तिच्या पालकांच्या स्वाधीन केली....तेंव्हा तिच्या आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला अन महाराष्ट्र पोलिसांचे मनोमन आभार मानले.


Conclusion:वरवर पाहता ही घटना सहज साधी वाटत असली तरी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत गुन्हा घडला की पोलिसांकडे बोट करणाऱ्या व्यवस्थेत सोलापूर शहर पोलिसांनी बजावलेली भूमिका नक्कीच कौतुकास पात्र आहे.
Last Updated : Dec 15, 2019, 11:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.