ETV Bharat / state

पदवीधर रणधुमाळी : सोलापुरात दुपारी 12 पर्यंत 20.72 तर शिक्षक मतदार संघात 35.36 टक्के मतदान

author img

By

Published : Dec 1, 2020, 3:40 PM IST

पदवीधर मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण 123 मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीत 42 हजार 70 पुरुष, तर 11 हजार 742 स्त्री मतदारांची संख्या आहे.

solapur graduate election update
सोलापूर पदवीधर निवडणूक अपडेट

सोलापूर - विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे. सकाळी 8 ते 12 या कालावधीत पदवीधरांसाठी 20.72 टक्के तर शिक्षक मतदार संघात 35.36 टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान, शहरातील मतदार केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

पदवीधर मतदान -

पदवीधर मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण 123 मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीत 42 हजार 70 पुरुष, तर 11 हजार 742 स्त्री मतदारांची संख्या आहे. सकाळी 8 ते 10 कालावधीत 9 हजार 473 पदवीधर पुरुषांनी तर 1679 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघात दुपारी 12 पर्यंत 20.72 टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा - शिक्षक- पदविधरसाठी आज मतदान; महाविकास आघाडी विरोधात भाजपचा लागणार कस

शिक्षक मतदारसंघ -

शिक्षक मतदार संघात 13 हजार मतदार आहेत. यामधून 4 हजार 66 पुरुष शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. तर 737 महिला शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला, अशा एकूण 4 हजार 803 शिक्षकांनी हक्क बजावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.