ETV Bharat / state

Bhandara Scattered On Vikhe Patil : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळ्यानं गोंधळ, नेमकं काय घडलं?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 9:50 PM IST

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळ्यानं शासकीय विश्रामगृहावर गोंधळ निर्माण झाला होता. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेखर बंगाळेनं अचानक भंडारा उधळ्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला.

Bhandara scattered on Vikhe Patil
Bhandara scattered on Vikhe Patil

राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

सोलापूर : शासकीय विश्रामगृहावर आज सकाळी धनगर समाजाच्या युवा नेत्यानं महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळ्यानं एकच गोंधळ निर्माण झाला होता. शेखर बंगाळे असं भंडारा उधळणाऱ्या युवा कार्यकर्त्याचं नाव आहे. शेखर बंगाळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी आला होता. मात्र, त्यानं अचानक विखे पाटलांवर भंडारा उधळ्यानं पोलिसांची चांगलीच तारांबळ उडली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ बंगाळे यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर बंगाळेला बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

उधाळलेला भंडारा पवित्र : यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भंडारा उधळल्यानंतर धनगर समाजानं माझ्या अंगावर उधाळलेला भंडारा मी पवित्र मानतो. भंडारा पवित्र असतो म्हणून मी त्याचा स्विकार करतो असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.

भाजपा कार्यकर्त्यांचा बंगाळेला चोप : मी धनगर समाजांच्या कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारत होतो. मात्र, शेखर बंगाळेनं माझ्यावर भंडारा उधाळला, हे सगळं अचानक घडल्याचं पाटील म्हणाले. शेखर बंगाळे यानं गुपचूप खिशात हात घालून विखे पाटलांच्या अंगावर भंडार उधळला. त्यावर भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शेखरला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनमुळे भाजपा पदाधिकाऱ्यांनी चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, राधाकृष्ण विखे पाटलांनी कार्यकर्त्यांना समज घालत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

शेखर बंगाळे यांच्यावर गुन्हा दाखल करू नये : प्रसारमाध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, धनगर समाजाचे कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्यावर गुन्हा दाखल करू नये, अशा सूचना मी पोलिसांना दिल्या. धनगर समाजासाठी स्थापन झालेल्या महामंडळासाठी 10 हजार कोटी रुपये उभे केले आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे आरक्षणाच्या प्रश्नाचे गांभीर्य संपत चालल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलीय.

चळवळ बदनाम करण्याचं काम : एकीकडे जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. तर, दुसरीकडं धनगर समाजानं नुकताच आंदोलन केलंय. आरक्षणाचा मुद्दा रास्त आहे, पण दुर्दैवानं राजकीय पक्ष मागे राहून त्याचा फायदा घेत आहेत. यामुळे समाजाला न्याय मिळत नसून चळवळ बदनाम करण्याचं काम विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केलाय.


भाजपा शहराध्यक्षांनी मागितली माफी : भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे स्वत: शेखर बंगाळे यांना महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडं घेऊन गेले होते. त्यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे यांनी खिशातून भंडारा काढत विखे पाटलांवर टाकला. त्यामुळं माझ्याकडून अवधानानं धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी संपूर्ण धनगर समाजाची माफी मागतो. याचं भांडवल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी करू नये, असं म्हणत शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माफी मागितली.

हेही वाचा -

  1. Dearness Allowance hike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, चार टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता
  2. NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी
  3. Dearness Allowance hike : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, चार टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.