NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी

NCP Political Crisis: अजित पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार..निवडणूक आयोगाकडं केली ही' मागणी
NCP Political Crisis राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत जाऊन दुसरा भूकंप केला. अजित पवारांच्या बंडाळीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्हीच राष्ट्रवादी असल्याचे दावे करण्यात आले आहेत. अशा स्थितीत शरद पवार गटाने अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावल्याची माहिती समोर येत आहे. तसचं अजित पवार गटातील ४० आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केलीय.
मुंबई NCP Political Crisis- अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं आपलं उत्तर सादर करण्यासाठी 8 सप्टेंबर ही मुदत दिली होती. दोन्ही गटांनी आपले उत्तर निवडणूक आयोगाला सादर केलयं. अजित पवार गटाच्या 9 मंत्री आणि 31 आमदार यांच्यावर अपात्रतेविषयी कारवाई करण्याची याचिका शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आली आहे. 31 मधील 4 आमदार विधानपरिषदमधील आमदार आहेत.
शरद पवार गटाने अजित पवार गटाचे दावे फेटाळल्यानंतर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि आम्ही एनडीएसह राज्यात महायुती सोबत जाण्याचा 2 जुलैचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की, या निर्णयावर निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल. राज्यातील महायुतीसोबत जाण्यासंदर्भात सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून यासंदर्भात निर्णय घेतला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या दाव्यांची माहिती तटकरे यांनी दिली नाही.
पक्ष आणि चिन्हाची लढाई, शिवसेना पक्षाबाबतचा दाखला -शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपा सोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शिंदे गटानं शिवसेना नाव आणि चिन्हावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगानं त्यांना दिलेल्या निर्णयाचा आधार अजित पवार गटानं घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह यावर अजित पवार गटाने देखील दावा केला असल्याचा समोर येत आहे. अजित पवार गटानं पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे पक्षाचे बहुतेक आमदार असल्याचा दावा निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात केलाय. हे सर्व दावे शरद पवार गटानं फेटाळले आहेत. अजित पवार गटानं बहुमत आमच्याकडं असल्याचं दावा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून आलेल्या उत्तरानंतर केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्ह नेमकं कोणाचं यासंदर्भात काय निर्णय घेतो, याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलय.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि अलीकडच्या काळात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय कायदेशीर आणि संवैधानिक असल्याची खात्री करूनच आम्ही निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भातील सुनावणी नियमाप्रमाणे निवडणूक आयोग घेईल.आम्ही देखील त्याबाबतचे उत्तर दाखल केले आहे- अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे
हेही वाचा-
