ETV Bharat / state

राज्य शासनाने धनगर आरक्षणासंदर्भात न्यायालयाची फी भरावी : महादेव जानकर

author img

By

Published : Feb 2, 2021, 9:51 PM IST

राज्य सरकार न्यायालयात मराठा आरक्षणासाठी जसे पैसे भरते तसेच धनगर समाजाच्या वकिलांची फी देखील भरावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. ते पंढरपूर येथे पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकी निमित्ताने आले होते.

पंढरपूर

पंढरपूर (सोलापूर) - देवेंद्र फडणवीस यांच्या काळात धनगर समाजाला आदिवासी सवलती देण्यात येत होत्या. मात्र, सध्याच्या राज्य सरकारने बजेटमध्ये एक रुपयांची तरतूद केलेली दिसत नाही. धनगर समाजातील अधिकारी आरक्षणासाठी न्यायालयात धाव घेत आहेत. राज्य सरकार न्यायालयात मराठा आरक्षणासाठी जसे पैसे भरते तसेच धनगर समाजाच्या वकिलांची फी देखील भरावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. ते पंढरपूर येथे पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकी निमित्ताने आले होते.

भाजपने वीज बिल प्रश्नावर आंदोलन करणे ही चांगली गोष्ट आहे. आमच्या पक्षाने आधीच ते आंदोलन केले आहे. यातूनच विरोधातील जे पक्ष आहेत. आपली ताकद दाखवून देत आहेत. सर्व पक्ष आपल्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे एनडीए घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच रासप स्थापनेपासून स्वतंत्र निवडणुका लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने वीज बिल माफी करावी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार वीज बिलाच्या मुद्द्यांवरून घुमजाव करत आहे. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण विज बिल माफ केले पाहिजे. एखाद्या उद्योगपतीचे बिल होत असेल तर राज्य सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेबाबत कायदा दाखवण्याचा प्रयत्न करू नये. ज्याप्रमाणे राज्य सरकारने वीज बिल माफ करू, असे सांगितले होते. त्याप्रमाणे विज बिल माफी करावी, अशी मागणी जानकर यांनी केली.

पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने भाजपकडून साईट ट्रेक केले जात आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना जानकर म्हणाले. राज्यात पक्ष वाढीचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला कोठेही जाण्याचा अधिकार आहे. यामुळे कोणाही नाही साईट ट्रेक प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही पण ब्राह्मण समाजातील लोकांना आमच्याकडे वळू शकतो. प्रशांत परिचारक सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. ते उद्या रासप पक्षात येऊ शकतात जर ते नाही आले तर त्यांचे बंधू उमेश परिचारक हे माझ्या पक्षात देऊ शकतात. यामुळेच पक्षाची ताकद वाढत असते. तसेच परिचारक यांच्या पक्ष प्रवेशाला संदर्भात चर्चा नसल्याचे, त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.