ETV Bharat / state

गोवा बनावटीचा लाखों रुपयांचा मद्यसाठा सोलापुरात जप्त; चार संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Oct 19, 2021, 5:38 PM IST

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुर्डवाडी शेटफळ या मार्गावर मोठी कारवाई केली आहे. एका टेम्पो आणि कारमधून स्वस्त दरात विदेशी मद्य विकत असताना कारवाई करण्यात आली. या कारवाईत 26 लाख 20 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल व तसेच मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

छायाचित्र
छायाचित्र

सोलापूर - सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुर्डवाडी शेटफळ या मार्गावर मोठी कारवाई केली आहे. एका टेम्पो आणि कारमधून स्वस्त दरात विदेशी मद्य विकत असताना कारवाई करण्यात आली. या कारवाईत 26 लाख 20 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल व तसेच मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

माहिती देताना अधीक्षक नितीन धार्मिक

महामार्गावर स्वस्त दरात दारू विक्री

गोवा राज्यातून स्वस्त दरात विदेशी दारूच्या बाटल्या खरेदी करून महाराष्ट्र राज्यात सर्रास विक्री केली जाते. यावर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन पाळत ठेवून असतात. महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्यावर भरमसाठ महसूल असल्याने महाराष्ट्रात दारू महाग आहे. हे दारू तस्कर मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने गोवा राज्यातून विदेशी दारू अवैध रित्या महाराष्ट्रात आणतात. महाराष्ट्रातील महामार्गावर असलेल्या ढाब्यांमध्ये ही दारू विक्री केली जाते. त्यातून मोठी कमाई केली जाते.

कुर्डवाडी शेटफळ येथे कारवाई; टेम्पो भरून मद्यसाठा जप्त

सोमवारी (दि. 18) रात्री 7 ते 9.30 दरम्यान सोलापूर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास एका खबऱ्याने माहिती दिली होती आणि त्यानुसार सापळा लावण्यात आला. शिवप्रसाद ढाब्या समोर राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी एक टेम्पो व कार ताब्यात घेतली. त्यामध्ये 190 बॉक्स गोवा राज्य निर्मित मद्यसाठा जप्त केला. या कारवाईमध्ये विलास मोराळे, कृष्णा मुजमुळे, गणेश जाधव, मिलिंद मगरे यांनाही अटक करण्यात आली आहे.

सखोल तपास करून कारवाई केली जाणार

सोलापुरात गोवा राज्य निर्मित मद्यसाठा आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. सोलापुरातील दारू तस्कर नेहमी गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून सोलापुरात आणून विक्री करतात. याची सखोल चौकशी केली जाणार आहे व तसेच गोवामध्ये असलेल्या दारू तस्करावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली. कुर्डवाडी-शेटफळ रस्त्यावर झालेल्या कारवाईमध्ये भरारी पथकातील निरीक्षक सुदर्शन संकपाळ, अंकुश अवताडे, दुय्यम निरीक्षक सुनील पाटील, गजानन होळकर, प्रकाश सावंत, चेतन व्हनगंटी, नंदकुमार वेळापुरे, किशोर लुंगसे, विकास वडमीले, विजय शेळके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

हेही वाचा - अजित पवारांच्या बहिणी 'जरंडेश्वर'मध्ये भागीदार; शरद पवारांना किरीट सोमैयांचे खुले आव्हान, म्हणाले..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.