ETV Bharat / state

Drug Seized In Solapur : सोलापुरात ड्रग्जचं पुन्हा घबाड; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 4:32 PM IST

Drug Seized In Solapur
जप्त करण्यात आलेले केमिकल

Drug Seized In Solapur: सोलापुरातील एमआयडीसीत ड्रग्जचा कच्चा साठा (Raw stock of drugs seized) नाशिक पोलिसांची कारवाई करून जप्त केला आहे. पोलिसांनी एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे टू-क्लोरो प्रोपियोनाईल क्लोराईड या दोन हजार लिटर केमिकलचा साठा सोलापुरातून हस्तगत केला आले. पोलिसांनी या प्रकरणी दहावा संशयित वैजनाथ हळवे या आरोपीला अटक केली आहे. (Solapur Crime)

ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर धाड

सोलापूर Drug Seized In Solapur : नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूरमध्ये उघडकीस आणलेल्या एमडी अंमली पदार्थ कारखान्या प्रकरणी दहावा संशयित वैजनाथ हळवे या आरोपीला अटक केली आहे. अटक झाल्यानंतर वैजनाथ हळवे (drug smuggler arrested) याकडून मिळालेल्या माहितीनुसार एमडी अंमली पदार्थ बनविण्यासाठी महत्त्वाचे असलेले टू-क्लोरो प्रोपियोनाईल क्लोराईड दोन हजार लिटर केमिकल जप्त (Drug chemical stock seized from Solapur) करण्यात आले आहे. ड्रग्ज रॅकेट मधील फरार असलेल्या दोन संशयितांचा मुंबई पोलीस, नाशिक पोलीस कसोटीने तपास करत आहेत.

दोन हजार लिटर केमिकल साठा जप्त: सोलापूरमधील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे केलेल्या चौकशीत सोलापूरमधील वैजनाथ सुरेश हळवे (रा. मोहोळ, सोलापूर) याचा देखील यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली. नाशिक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी वैजनाथ हळवे याला याप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. नाशिक पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, सोलापूरमध्ये नाशिक अंमली विरोधी पथकाने ज्या ठिकाणी एमडी बनवणारा कारखाना उद्ध्वस्त केला. तेथूनच काही अंतरावर एका कारखान्यातून एमडी अंमली पदार्थ बनवण्यासाठी महत्त्वाचे असलेले टू- क्लोरो प्रोपियोनाईल क्लोराईड दोन हजार लिटर केमिकल शुक्रवारी जप्त केले.

सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसी पुन्हा एकदा चर्चेत: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेली चिंचोळी एमआयडीसी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या टीमने गवळी बंधूना अटक केल्यानंतर चिंचोळी एमआयडीसीत कारवाई केली होती. त्यानंतर काही दिवसांनी सोलापूर पोलिसांनी कारवाई करत घोडके बंधूना अटक करून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्जसाठा व कच्चा माल, केमिकल जप्त केला होता. ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे थेट सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी पर्यंत आले व नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाने एमआयडीसीत येऊन कारवाई केली होती. ड्रग्ज रॅकेट मधील दहाव्या संशयित आरोपीने देखील सोलापुरातील एमआयडीसी कारखाना दाखवला आहे. सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी पुन्हा एकदा ड्रग्ज कारवाई प्रकरणात चर्चेत आली आहे.

हेही वाचा:

  1. Drugs Factory Destroyed : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाचा ड्रग्ज कारखाना उध्वस्त; १३५ किलो एम डी ड्रग्ज जप्त
  2. Raid On Drug Factory: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना; मिरा भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई
  3. Action on Drugs in Solapur : एमडी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त; एमडी ड्रग्ज बाजारात पुन्हा आलं सोलापूरचंही नाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.