ETV Bharat / state

Raid On Drug Factory: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना; मिरा भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 4:44 PM IST

Raid On Drug Factory: पालघर जिल्ह्यात ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे. ड्रग्ज संबंधी काही आरोपींना मिरा भाईंदर मधील काशिमीरा गुन्हे शाखेने अटक केली. (Mira Bhayandar Crime Branch Action) यानंतर तपासात वसई मधील एका प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली. त्याने पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील एका फार्म हाऊसर ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचं सांगितलं. या माहितीच्या आधारे संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकला गेला. (Drug Smuggling)

Raid On Drug Factory
मिरा भाईंदर गुन्हे शाखेची कारवाई

मोखाडा (पालघर) Raid On Drug Factory : राज्यात नाशिक, सोलापूर आणि संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यातही ड्रग्जचा कारखाना असल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कावळपाडा गावानजीक एका फार्म हाऊसवर मिरा भाईंदर मधील गुन्हे शाखेच्या एका टीमने छापा टाकला. दरम्यान येथे 36 कोटी 90 लाख 74 हजार रुपयांचे ड्रग्ज व ड्रग्ज बनवण्यासाठीचे साहित्य जप्त केल्याचे समोर आले आहे. या कारवाईत अतिशय गुप्तता पाळल्यामुळे नेमके किती किमतीचे ड्रग्ज, साहित्य होते. तसंच यातील प्रमुख आरोपी कोण याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या कारवाईनंतर आता नाशिक ड्रग्ज प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Farm Houser Drug Manufacturing Factory)

आरोपीने सांगितला ड्रग्जच्या कारखान्याचा पत्ता : याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज संबंधी काही आरोपींना मिरा भाईंदर मधील काशिमीरा गुन्हे शाखेने अटक केली. यानंतर तपासात वसई मधील एका प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली. पुढे सदरचे ड्रग्ज नेमके कुठून उपलब्ध झाले याबाबत अधिक तपास केला. यामध्ये आरोपीने मोखाडा तालुक्यातील या फार्म हाऊसवर ड्रग्ज बनावण्यात येत असल्याचं सांगितलं. नंतर अतिशय गोपनीय पद्धतीने तपासी टीमने या फार्म हाऊसवर आरोपीसाहित कारवाईला सुरुवात केली. यावेळी रात्री उशिरा पर्यंत ड्रग्ज बनवण्याचे साहित्य त्याच प्रमाणे काही प्रमाणात ड्रग्जही हस्तगत केल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र आता ड्रग्जच्या विळख्यात? - हाती आलेल्या माहितीनुसार हे फार्म हाऊस आठ वर्षांपूर्वी समीर पिंजार या व्यक्तीच्या नावाने आहे. या व्यक्तीचा या प्रकरणात काही संबंध आहे का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. जप्त झालेलं साहित्य पिक अप गाडीतून नेल्याचं आता समोर येतं असल्यानं साहित्याची रक्कम मोठी असल्याचं चिन्ह आहे. एकूणच या प्रकरणामुळे महाराष्ट्र आता ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. या छाप्यामुळे आणखी एक ड्रग्ज कारखाना उघडकीस आला असून राज्यात खळबळ माजली आहे.

हेही वाचा:

  1. Drugs Factory Destroyed : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाचा ड्रग्ज कारखाना उध्वस्त; १३५ किलो एम डी ड्रग्ज जप्त
  2. Drug Manufacturing Factory Found बडोद्याजवळ सापडला 1000 कोटींचा ड्रग्ज बनविणारा कारखाना, गुजरात एटीएसची कारवाई
  3. Nigerian Arrested In Nagpur : ऑर्गनिक औषध पावडरच्या नावाखाली चक्क माती विकली; नायजेरीयन अटकेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.