ETV Bharat / state

Nigerian Arrested In Nagpur : ऑर्गनिक औषध पावडरच्या नावाखाली चक्क माती विकली; नायजेरीयन अटकेत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 9:52 PM IST

Nigerian Arrested In Nagpur : ऑर्गनिक औषधं पावडरच्या नावाखाली चक्क माती विकणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकास नागपूरच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चिनोन्सो न्वाकोहो राफेल (३७) असे या आरोपीचे नाव आहे. सायबर पोलिसांनी त्याच्याकडून दोन देशांच्या पासपोर्टसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी त्याचे बँकेचे खाते देखील गोठवले आहेत.

Nigerian Arrested In Nagpur
नायजेरीयन नागरिकास अटक

नागपूर : Nigerian Arrested In Nagpur : या संदर्भात नागपूर सायबर पोलीस विभागाचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी यांचे फार्मसीचे दुकान आहे. फिर्यादी औषधे एक्सपोर्टचे काम सुद्धा करतात. फिर्यादीला त्यांच्या मोबाईलवर मॅसेज आला की, आम्हाला रिलायबल जेनुअन सप्लायरची भारतात आवश्यकता आहे. तुम्ही या कामासाठी इंटरेस्टेड आहात का? अशी विचारणा केली.


आरोपीच्या जाळ्यात अडकले फिर्यादी : आरोपीने त्यांचे नाव Desmond Jeffrey असल्याचं सांगितलं. त्याच्या BKL Bio Pharma या कंपनीला CORADIC ORGANIC पावडरची औषधे बनवण्यासाठी नेहमी आवश्यक असते. हे पावडर मुंबई येथे वैशाली कुमार यांच्याकडे मिळेल असं देखील सांगितलं. फिर्यादीने त्याला CORADIC ORGANIC POWDER सप्लाय करण्याची सहमती दर्शविली.

१०० किलो पावडरची केली मागणी : आरोपीने दिलेल्या वैशाली कुमार यांच्या वॉटसअपवर संपर्क साधून फिर्यादीने एक किलो पावडरचे एक पॅकेट मागविले. या गुन्ह्यांतील अटक नायजेरीयन आरोपी हा CORADIC ORGANIC POWDER सॅम्पल चेक करण्याकरिता नागपूर येथे आला. त्याने सॅम्पल ओके करून आणखी १०० किलो पावडरची मागणी केली. फिर्यादीने गुन्ह्यातील वैशालीकुमार यांचेशी संपर्क साधून आणखी मालाची मागणी केली व त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण १५ लाख ८५ हजार पाठविले.


कंपनी बोगस असल्याचं समजलं : फिर्यादीने कंपनीच्या नावाची ऑनलाईन अम्बेसीच्या वेबसाईटवर पडताळणी केली असता आरोपीची कंपनी ही बनावट असल्याचे तसेच आरोपीने फिर्यादीला पाठविलेले बिल सुध्दा बनावट असल्याचे लक्षात आले. फिर्यादीच्या रिपोर्ट वरून सायबर पोलीस ठाणे येथे विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला गेला.


आरोपीचे ५२ बँक खाते : गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीच्या बँक खात्या संबंधाने माहिती प्राप्त करण्यासाठी बँकेस पत्रव्यवहार करून बँक खाती गोठविण्यात आली. आरोपीच्या बँक अकाउंटची माहिती प्राप्त केली असता एकूण ५२ बँक खाते आरोपीनी वेगवेगळ्या नावाने उघडून फिर्यादी व इतर लोकांकडून फसवणुकीची रक्कम प्राप्त केली. ती वेगवेगळ्या बँक खात्यात वळती करून एटीएम विड्रॉल केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.

हेही वाचा:

  1. Husband Torture Wife : विदेशात पती करायचा पत्नीचा छळ; भिवंडीत गुन्हा दाखल
  2. Thane Crime News: पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; पतीसह सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल
  3. Financial Fraud In Mumbai: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली उकळले ८० लाख
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.