ETV Bharat / state

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १५ दिवसात ११० किमी जमिनीचे सीमांकन करा - अजित पवार

author img

By

Published : Feb 18, 2020, 11:32 PM IST

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेसाठी उजनी जलाशय जवळ पंप हाऊस व जॅकवेल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ०.२५ हेक्‍टर जागा त्वरित महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. जमिनीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना

सोलापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी येत्या १५ दिवसांत ११० किमी जागेचे सीमांकन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी शासन आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देईल. उजनी जलाशयाजवळ पंप हाऊस व जॅकवेल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ०.२५ हेक्‍टर जागा त्वरित महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. जमिनीचे सीमांकन पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करताना अनेक ठिकाणी ही भूमिगत पाइपलाइन शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या पाईपलाईनचे काम करावे व शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले. सोलापूर शहर पाणीपुरवठा योजना २ टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर शहरासाठी उजनी ते सोलापूर समांतर ११० दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तर, दुसर्‍या टप्प्यात सोलापूर शहरासाठी वितरण व्यवस्था सुधारण्यात येणार आहे. ही योजना सुमारे ४६४ कोटींची असून यातून प्रतिदिन ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेमुळे सोलापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा - देशासह जगात संक्रमणाचा काळ, भारत जगासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत - डॉ. मोडक

या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - ...म्हणून पोटच्या पोराच्याच खूनाची दिली सुपारी, जन्मदात्याची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.