ETV Bharat / state

Congress Agitators : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानाजवळ पोलिसांनी रोखले काँग्रेस कार्यकर्त्यांना

author img

By

Published : Feb 15, 2022, 3:03 PM IST

Updated : Feb 15, 2022, 3:38 PM IST

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते ( Congress Agitators ) केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Central Minister Narayan Rane ) यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. दरम्यान, मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी राणे यांच्या बंगल्याबाहेर हजेरी लावून घोषणाबाजी सुरू केली. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ( Sindhudurg Police ) काँग्रेस कार्यकर्त्यांना राणे यांच्या निवासस्थानापासून शंभर मीटर अंतरावर रोखले.
काँग्रेस कार्यकर्ते
काँग्रेस कार्यकर्ते

सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ( Central Minister Narayan Rane ) निवासस्थानापासून 100 मीटर अंतरावरच पोलिसांनी ( Sindhudurg Police ) काँग्रेस कार्यकर्त्यांना ( Congress Agitators ) रोखले. यावेळी 50 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळपासून राणे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामुळे कणकवलीत वातावरण तापले होते. दरम्यान, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना सबुद्धी द्यावी, अशा आशयाचे गाऱ्हाणे राणेंच्या निवसस्थानासमोर घातले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानाजवळ पोलिसांनी रोखले काँग्रेस कार्यकर्त्यांना

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Central Minister Narayan Rane ) यांच्या निवस्थाना समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते राणेंच्या बंगल्या बाहेर एकवटले. दरम्यान, हिंमत असले तर बंगल्यावर येऊन दाखवा, असे प्रतिआव्हान भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे यांनी दिले आहे. काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा देऊन नाहक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंगला हा खासगी आहे, शासकीय नाही. त्यामुळे येथे आंदोलन करता येणार नाही. उगाच आम्हाला आव्हाने देऊ नका, असा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानाकडे निघाले होते. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ( Sindhudurg Police ) काँग्रेस कार्यकर्त्यांना राणे यांच्या निवासस्थानापासून शंभर मीटर अंतरावर रोखले.

हेही वाचा - Sindhudurg BJP And Shiv Sena : कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना आमदार वैभव नाईक आमने-सामने

Last Updated :Feb 15, 2022, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.