ETV Bharat / state

मेट्रोच्या नव्या कारशेडला एकही रुपया खर्च नाही, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

author img

By

Published : Oct 13, 2020, 12:52 PM IST

Updated : Oct 13, 2020, 1:06 PM IST

'मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी नव्या जागेला पैसे दिले जाणार आहेत, असा गैरसमज पसरवला जातोय. मात्र, नव्या जागेसाठी एकही रुपया दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे,' असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला असण्याची शक्यता असून याबाबत पोलीस तपास करत असल्याचीही माहिती दिली.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत न्यूज
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत न्यूज

सिंधुदुर्ग - 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तेव्हापासूनच आरेमध्ये मेट्रोची कारशेड नको, ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. मात्र, सध्या नव्या जागेला पैसे दिले जाणार आहेत,असा गैरसमज पसरवला जातोय. मात्र, नव्या जागेसाठी एकही रुपया दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे,' असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.

मंत्री सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला असण्याची शक्यता असून याबाबत पोलीस तपास करत असल्याचीही माहिती दिली. 'मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला असल्याची शक्यता आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर त्याचा तपास करत आहेत. त्यामुळे येत्या ८ दिवसांत चित्र स्पष्ट होईल,' असे ते म्हणाले.

मेट्रोच्या नव्या कारशेडला एकही रुपया खर्च नाही - सामंत

हेही वाचा - परिवहन मंत्री अनिल परब कोरोनाबाधित, लीलावती रुग्णालयात दाखल

ओरोस येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी संवाद साधला. 'या वेळी मेट्रो कारशेड आरेमधून हलवण्याचा निर्णय हे राज्य सरकारच्या दुर्दैवी आहे. यामुळे जमिनीला द्याव्या लागणाऱ्या पैशांतून चार हजार कोटींचं नुकसान होणार आहे,' अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'ज्यांनी टीका केली तेही राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेव्हापासूनच शिवसेनेची ही भूमिका होती. विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भूमिका होती की, आरेमध्ये ही कारशेड नको. सध्या नव्या जागेसाठी पैसे दिले जाणार आहेत, असा गैरसमज पसरवला जातोय. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले आहे की, नव्या जागेसाठी पैसे दिले जाणार नाहीत. मात्र, विरोधक म्हटल्यानंतर विरोधकाची भूमिका घेतली पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून ते काम करत असतील. त्यामुळे ते विरोध करत आहेत,' असा टोला सामंत यांनी लगावला.

'अंतिम वर्षाच्या परीक्षांतील घोळ थांबणार कधी, यावर ते म्हणाले की, अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये डिस्टन्स एज्युकेशनच्या परीक्षांमध्ये घोळ होता. त्याची परीक्षा पुढे गेलेली आहे. मी मुंबईत विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला असे कळले की, सायबर हल्ला सिस्टिमवर असू शकतो. त्या दृष्टिकोनातून तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर या तपास करत आहेत. येत्या 8 ते 10 दिवसात त्याचे खरे चित्र स्पष्ट होईल,' अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

हेही वाचा - आणखी एका कोरोना लसीची चाचणी थांबली; दुष्परिणाम आढळल्याने निर्णय

Last Updated : Oct 13, 2020, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.