ETV Bharat / state

जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा संकल्प करुया; पालकमंत्री दीपक केसरकर

author img

By

Published : Aug 15, 2019, 3:23 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 कोटी रुपयांचा तातडीचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्यात आली असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आणखी शासकीय मदत मिळणार आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्यदिनानिमित्त ते बोलत होते.

जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा संकल्प करुया; पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा आज संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण समारोह कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा संकल्प करुया; पालकमंत्री दीपक केसरकर

जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 कोटी रुपयांचा तातडीचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्यात आली असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आणखी शासकीय मदत मिळणार आहे. जिल्ह्याची स्वतःची आपत्ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला एक बोट, त्याची वाहतूक करण्यासाठी एक वाहन आणि प्रशिक्षीत टीम देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

कलम 370 रद्द करून काश्मीरी जनतेला रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून दिल्या. तसेच एक राष्ट्र-एक घटना या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक नव्या योजनांना चालना दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या चांदा ते बांदा या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी. तसेच जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, फळबाग लागवड यासारख्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे उपस्थित होते.

Intro:सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा आज संकल्प करुया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण समारोह कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.Body:यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम,  अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. आंबोकर, आमदार वैभव नाईक, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.Conclusion:जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 कोटी रुपयांचा तातडीचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्यात आली असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आणखी शासकीय मदत मिळणार आहे. जिल्ह्याची स्वतःची आपत्ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक बोट, त्याची वाहतूक करण्यासाठी एक वाहन आणि प्रशिक्षित टीम देण्यात येणार आहे. कलम 370 रद्द करुन काश्मिरी जनतेला रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करुन एक राष्ट्र एक घटना या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक नव्या योजनांना चालना दिल्याबद्दल त्यांचेही मी अभिनंदन करतो. जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या चांदा ते बांदा या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो. तसेच जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, फळबाग लागवड या सारख्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.