ETV Bharat / state

Udayanraje Bhosale News: अनीस फारुकीचा उदयनराजेंनी केला वाढदिवस साजरा, प्रबळ इच्छाशक्ती पाहून राजे झाले प्रभावित

author img

By

Published : May 4, 2023, 5:10 PM IST

Udayanraj celebrated the birthday
अनीस फारुकीचा उदयनराजेंनी साजरा केला वाढदिवस

सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्वभावाचा भावनिक पैलू समोर आला आहे. ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रोफीसारख्या गंभीर आजाराशी झुंजणार्‍या मुंबईच्या अनीस फारूकी या चाहत्याचा वाढदिवस साजरा करत उदयनराजेंनी त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.

सातारा : मुंबई येथील अनीस फारुकी यांना ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रोफीचा त्रास आहे. याचा श्वसनाच्या स्नायूंवरही परिणाम झाला त्यामुळे त्याला जगण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे आणि आता तो गेल्या 24 वर्षांपासून 24 तास व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टमवर आहे. ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रोफीसारख्या गंभीर आजाराशी झुंजणार्‍या मुंबईच्या अनीस फारूकी या चाहत्याचा वाढदिवस साजरा करत उदयनराजेंनी त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.



उदयनराजेंना भेटण्यासाठी सातारा गाठला : पर्यटन आणि निसर्गाच्या सान्निध्यात रमणारा अनीस उदयनराजेंना भेटण्यासाठी आपल्या कुटुंबासह सातार्‍यात आला होता. उदयनराजेंना भेटण्याची त्याची इच्छा ऐकून उदयनराजेंनी त्याची आपल्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट घेतली. त्याच दिवशी त्याचा वाढदिवसही होता. त्यानिमित्त उदयनराजेंनी त्याला केक भरवला. उदयनराजेंशी झालेल्या या ग्रेट भेटीमुळे अनीसचा आनंद गगनात मावत नव्हता.



चोवीस वर्षे व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टिमवर: मुंबई येथील अनीस फारुकी याला ड्यूचेन मस्कुलर डिस्ट्रोफीचा त्रास असल्याचे निदान वयाच्या पाचव्या वर्षी झाले. हा एक गंभीर आजार असून या आजारामुळे दररोज त्याचे स्नायू कमकुवत होत आहेत. आजाराचा त्याच्या श्वसनाच्या स्नायूंवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे तो गेली चोवीस वर्षे 24 तास व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टिमवर आहे. अशा गंभीर आजारातही अनीस याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन आणि त्याच्यातील प्रबळ इच्छाशक्ती पाहून उदयनराजे प्रभावित झाले. दहावीच्या परीक्षेत त्याने 84 टक्के गुण मिळविले होते. त्याला निसर्ग सौंदर्य पाहायला आवडते. महाराष्ट्राच्या पर्वतांचे आणि हिरव्यागार निसर्गाची तो प्रशंसा करतो, या गोष्टी उदयनराजेंच्या निदर्शनास आल्या.



अनीसच्या विचारांनी ऊर्जा मिळाली: उदयनराजे यांना भेटण्याची अनीसची खूप दिवसांची इच्छा होती. त्यासाठी आई-वडीलांसोबत तो सातार्‍याला आला. त्याच्याकडे पाहून आणि आयुष्याविषयीचे त्याचे विचार ऐकून मला देखील नवी ऊर्जा मिळाली. माझे डोळे भरून आले. खूप वेळ आम्ही चर्चा केली. प्रबळ इच्छाशक्ती असल्यावर 24 तास व्हेंटिलेटरवर असणारी व्यक्ती सुध्दा आपले आयुष्य आनंदात कसे जगते, हे मी डोळ्यांनी पहिल्याचे कौतुकोद्गार उदयनराजेंनी काढले. तसेच आपल्या आनंदी जगण्याचे श्रेय अनीस याने आपल्या आई वडिलांना दिले. त्याचे आई-वडील गेली अनेक वर्षे त्याचा सांभाळ करत आहेत. मुलाची दिवस-रात्र सेवा करणाऱ्या अनीसच्या आई-वडिलांना उदयनराजेंनी सलाम केला. तसेच अनीसच्या वाढदिवसाचा जलमंदिर पॅलेसमध्ये केक कापून त्याला आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: Udayanaraje Bhosale News टाटा ग्रुपचे देशातील सर्व उद्योगपतींनी अनुकरण करायला हवे अदानींच्या संदर्भात उदयनराजेंचे मोठे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.