ETV Bharat / state

गांजा शेती करणार्‍या परदेशी आरोपींचा कारागृहात विवस्त्र होत धुमाकूळ

author img

By

Published : Feb 24, 2021, 11:55 PM IST

Updated : Feb 25, 2021, 6:29 AM IST

वाईत गांजा शेती केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन परदेशी आरोपींनी कारागृहात विवस्त्र होत गोंधळ घालून सीसीटीव्ही व शौचालयाच्या दाराचे नुकसान केले आहे. याबाबत कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

सातारा - वाईत गांजा शेती करून जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्‍या दोघा जर्मन नागरिकांनी जिल्हा कारागृहात धुमाकूळ घातला. कारागृहातील सीसीटीव्ही व शौचालयाच्या दरवाजाची मोडतोड केली. विवस्त्र होवून कारागृहात कर्मचार्‍यांशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गांजा शेती करणार्‍या परदेशी आरोपींचा कारागृहात विवस्त्र होत धुमाकूळ

बंगल्यातच पिकवला होता गांजा

पोलिसांकडून मिळालेल्याा माहितीनुसार, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील 'विष्णू श्री स्मृती' या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केली होती. पोलिसांनी 29 किलो गांजा इतर साहित्य असा एकूण ८ लाख 21 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्गीस व्हिक्टर मानका (वय 31 वर्षे), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय 25 वर्षे, दोघे रा.जर्मनी, सध्या रा. नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

कॅमेरा तसेच दरवाजाची तोडफोड

या दोघांनी 22 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरूवात केली. संशयितांनी दोन्ही कर्मचार्‍यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्त्र होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून ते बंदिस्त असलेल्या खोली क्र. 5 मधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुजावर पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - कराडजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक, 8 वर्षाच्या मुलासह तिघे ठार

Last Updated : Feb 25, 2021, 6:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.