ETV Bharat / state

Shirwal Students Beaten Case : शिरवळ विद्यार्थी मारहाण प्रकरणी तीन पोलिसांसह होमगार्ड निलंबित

author img

By

Published : Mar 11, 2022, 9:29 PM IST

shirwal
आंदोलन करताना विद्यार्थी

शिरवळ (Shirwal Students Beaten case) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी असणाऱ्या वसतिगृहामध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली होती. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका होमगार्डला निलंबित (Shirwal Police Suspended) करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

सातारा - शिरवळ (Shirwal Students Beaten case) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी असणाऱ्या वसतिगृहामध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली होती. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका होमगार्डला निलंबित (Shirwal Police Suspended) करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली. शिरवळचे अंमलदार नितीन महांगरे, बी.सी.दिघे, चालक डी.ए. धायगुडे, होमगार्ड मनोज नरुटे यांना निलंबित करण्यात आले आहे.

  • राज्यभर आंदोलने -

पोलिसांच्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरवळसह राज्यामधील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. दोषी पोलिसांना सेवेमधून बडतर्फ करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच राज्यातील इतर संघटनांनी देखील याविरोधात आंदोलन केले आहे.

  • विनाकारण मारहाण झाल्याचा दावा -

शिरवळ गावच्या हद्दीत क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. ९ मार्च रोजी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितीन महांगरे, बी.सी.दिघे, चालक डी.ए. धायगुडे, होमगार्ड मनोज नरुटे यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश करीत रूममध्ये असणाऱ्या १७ विद्यार्थ्यांना काठीने अमानुषपणे मारहाण केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या अंगावर मारहाणीमुळे काठ्यांचे व्रण उठले आहेत. आज शिरवळ पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी, उदगीर, मुंबई, नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी निदर्शने करण्यात आली. संबंधितांना सेवेतून बडतर्फ करावे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

  • गोंधळ घातल्याच्या तक्रारीमुळे कारवाई -

स्थानिक रहिवाशांनी वसतिगृहातील विद्यार्थी गोंधळ घालत आहेत अशी तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस वसतिगृहात गेल्यानंतर सदरील गोंधळ व मारहाण झाल्याची माहिती शिरवळ पोलिसांनी दिली. फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्य्क निरीक्षक राजकुमार भुजबळ, उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाई करण्याची मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली.

  • निलंबनाचे आदेश -

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ शिरवळचे अंमलदार नितीन महांगरे, बी.सी.दिघे, चालक डी.ए. धायगुडे, होमगार्ड मनोज नरुटे यांना निलंबित केल्याचे लेखी आदेश विद्यार्थ्यांना व महाविद्यलयाला दिले. तथापि, विद्यार्थ्यांनी पालक आल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू असे सांगत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण प्रकाराच्या चौकशीकरिता वाईच्या पोलीस उपअविभागीय अधिकारी शीतल जानवे-खराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.