ETV Bharat / state

Shivendraraje Vs Udayanraje : हत्तीची काय गरज, तुम्ही उडी मारली तर मी चिरडून जाईन; शिवेंद्रराजेचा उदयनराजेंना टोला

author img

By

Published : Feb 7, 2022, 2:29 PM IST

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचा वाद सर्वांना परिचित ( Shivendraraje Vs Udayanraje ) आहे. पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीवरुन ( Pandit Automotive Company ) दोघांत वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता हत्तीची काय गरज, तुम्ही उडी मारली तर मी चिरडून जाईल, असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला ( Shivendraraje Allegation Udayanraje ) आहे.

Shivendraraje Vs Udayanraje
Shivendraraje Vs Udayanraje

सातारा - सातारा एमआयडीसीतील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील ( Pandit Automotive Company ) वादात उडी घेत 'लोकशाही नसती तर हत्तीच्या पायाखाली चिरडलं असतं. कामगार चळवळ चिरडाल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे,' असा अल्टीमेटम खासदार उदयनराजे भोसले ( Mp Udayanraje Bhosale ) यांनी दिला आहे. या वक्तव्याचा आता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ( Mla Shivendraraje Bhosale ) समाचार घेतला आहे. 'उदयनराजे हत्तीची गरज काय? तुम्ही उडी मारलीत तरीही मी चिरडून जाईल,' असा उपरोधात्मक टोला त्यांनी ( Shivendraraje Allegation Udayanraje ) लगावला आहे.

प्रसारमाध्यमांना बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, "उदयनराजे हत्तीची गरज काय? तुम्ही उडी मारलीत तरीही मी चिरडून जाईन. साताऱ्यातील एमआयडीसी संपायला उदयनराजेच जबाबदार आहेत. कारखानदारांकडून हप्ते घेण, त्यांना दमदाटी करणे यामुळे साताऱ्यात एमआयडीसी कंपन्या आल्या नाहीत. असलेल्या कंपन्याही निघून गेल्या. मी खरेदी केलेली जागा संपूर्णपणे कायदेशीर आहे. सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचे आरोप बिनबुडाचे आहे."

आम्ही काय पाकिस्तानातून नाही आलो

"धमक्यांची सातारकरांना सवय झाली आहे. खासदारांनी तेथे येऊन काही केले तर ट्रेसपासचा गुन्हा दाखल करणार. तुम्हाला जायचे तर हायकोर्टात जावा, ते निर्णय देतील. आम्ही काय पाकिस्तानमधून आलो नाही. व्यवसाय आहे. सगळेच व्यवसाय करतात. आम्ही कारखानदारांनाच ही जागा दिली. हा निर्णय सातारच्या दृष्टीने चांगलाच आहे. एमआयडीसीत आलेल्या माणसांना धमक्या द्यायच्या आणि वसुली करायची यामुळेच तेथे कंपन्या आल्या नाही," असा आरोपही शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.

काय आहे वाद?

साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्हच्या जागेचा लिलाव शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतला आहे. यावरुन उदयनराजे भोसले यांनी उडी घेत शिवेंद्रराजे भोसलेंवर निशाणा साधला आहे. गेल्या 47 वर्षांत एमआयडीसीत कोणाची एकाधिकारशाही फोफावली हे उघड सत्य आहे. आम्ही बोलायला गेलो तर आमच्यावर खंडणीचे गुन्हे टाकायचे. पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कामगारांना आणि त्यांच्या अस्तित्वाला कोणी चिरडू शकत नाही. तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून टाळूवरचे लोणी खायचा अधिकार मिळाला काय? कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नाही, असे उदयनराजे भोसले ( Udayanraje bhosale Allegation ShivendraRaje Bhosale ) म्हणाले.

हेही वाचा - Kirit Somaiya attack case : किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.