ETV Bharat / state

'माझी वसुंधरा 'अभियानात कराड नगरपालिका राज्यात दुसरी 

author img

By

Published : Jun 6, 2021, 3:57 PM IST

'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत सन 2020-21 भूमी, अग्नि व आकाश या निर्सगाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत राज्यातील 222 नगरपालिकांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये कराड नगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

कराड नगरपालिका
'माझी वसुंधरा 'अभियानात कराड नगरपालिका राज्यात दुसरी 

कराड (सातारा) - 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत सन 2020-21 भूमी, अग्नि व आकाश या निर्सगाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत राज्यातील 222 नगरपालिकांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये कराड नगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा ऑनलाईन सन्मान सोहळा पार पडला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी हा सन्मान स्वीकारला.

माझी वसुंधरा संचालनालयाकडून ऑनलाईन पाहणी

गेली वर्षभर कराड नगरपालिका शहरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवित होती. माझी वसुंधरा संचालनालयाकडून कराड नगरपालिकेस प्राप्त झालेल्या पत्रात माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या दहा नगरपालिकांमध्ये कराड नगरपालिकेच्या नावाचा समावेश असल्याचे म्हटले होते. त्यानुसार दहा नगरपालिकांच्या उपक्रमांची माझी वसुंधरा संचालनालयाकडून ऑनलाईन पाहणी करण्यात आली होती.

देशपातळीवर सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक

जागतिक पर्यावरणदिनी (शनिवारी) दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कराड नगरपालिकेचा ऑनलाईन सन्मान करण्यात आला आहे.
कराड नगरपालिकेने स्वच्छता अभियानात देशपातळीवर सलग दोन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच यापुर्वी नगरपालिकेने शासनाचा वसुंधरा पुरस्कार मिळविला होता. माझी वसुंधरा अभियानात दुसरा क्रमांक पटकावल्याने कराडकरांनी नगरपालिका प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ऑनलाईन सन्मान सोहळ्यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, विनायक पावसकर, सौरभ पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.