ETV Bharat / state

Krushna Sugar Mill : कृष्णा नदीतील मृत मासे प्रकरण; 'या' कारखान्याला प्रदूषण मंडळाची नोटीस

author img

By

Published : Jul 24, 2022, 7:24 PM IST

कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याप्रकरणी ( krushna river dead fish case ) कृष्णा सहकारी साखर कारखान्याला शो कॉज नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही नोटीस बजावली ( maharashtra pollution control board notice to krushna sugar mill ) आहे.

Krushna Sugar Mill
Krushna Sugar Mill

सातारा - काही दिवसांपूर्वी सांडपाण्यामुळे कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी ( krushna river dead fish case ) पडले होते. त्याची दखल आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रेठरे बुद्रुक ( ता. कराड ) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याला शो कॉज नोटीस बजावली आहे. तसेच दि. 28 जुलै रोजी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले ( maharashtra pollution control board notice to krushna sugar mill ) आहेत.

Krushna Sugar Mill
कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याला बजावलेली नोटीस

सांडपाणी नदीत मिसळल्याने मासे मृत्युमुखी - कृष्णा सहकारी साखर कारखाना हा सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. कारखान्याचे घट्ट सांडपाणी (कंपोसेट यार्ड आणि तलावातून) जवळच्या स्थानिक नाल्यात सोडले जाते. ते कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे जलप्रदूषण होऊन आजूबाजूच्या परिसराला आणि जलस्रोतांना उपद्रव झाला आहे. दि. 14 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या हद्दीत कृष्णा नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. यासंदर्भात सांगली प्रादेशिक अधिकार्‍यांनीही प्रदूषण मंडळास कळविले होते. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल सादर केला होता.

Krushna Sugar Mill
कृष्णा सहकारी साखर कारख्यान्याला बजावलेली नोटीस

कंपोस्ट खताची अशास्त्रीय पध्दतीने साठवणूक - कृष्णा कारखान्याने कंपोसेट यार्डमध्ये सुमारे 500 मेट्रिक टन कंपोस्ट खत अशास्त्रीय पद्धतीने साठवल्याची बाब अधिकार्‍यांच्या निदर्शनास आली. कंपोस्टच्या साठ्यामुळे लीचेट्स निर्माण होऊन जवळच्या परिसराला त्याचा उपद्रव होत आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी आणि तरतुदींचे पालन न केल्यामुळे पर्यावरणास हानी पोहोचत असल्याचे निरीक्षण अधिकार्‍यांनी नोंदवले.

कारणे दाखवा नोटीस बजावली - तुमच्या उद्योगाला उत्पादन प्रक्रिया त्वरित बंद करण्याचे निर्देश का देऊ नये? उद्योगाचा जलविद्युत पुरवठा खंडित करण्याचे निर्देश का देऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने कृष्णा कारखान्याला बजावली आहे. तसेच तीन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आणि 28 जुलै पुणे येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार कार्यवाही न झाल्यास पर्यावरणीय कायद्यातील तरतुदींनुसार खटला दाखल केला जाईल, असेही नोटीसीमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा - Raju Vitakar : शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात सामील; 'त्या' रात्री नेमक काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.