ETV Bharat / state

Wildlife Treatment Center : पश्चिम महाराष्ट्रातील जखमी वन्यजीवांवर होणार कराडमध्ये उपचार

author img

By

Published : Apr 1, 2022, 7:29 PM IST

Updated : Apr 2, 2022, 9:26 AM IST

साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे कराड तालुक्यातील वराडे येथे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्राला ( Wildlife Treatment Center ) मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीने उपचार (Injured wildlife from western Maharashtra will be treated in Karad) मिळणार आहेत.

कराड (सातारा) : जखमी वन्यजीवांवरील उपचार व देखभालीसाठी कराड तालुक्यातील वराडे येथे अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी वर्ग झाला आहे. यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीने उपचार मिळणार आहेत. साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी वराडे (ता. कराड) येथे पश्चिम महाराष्ट्रातील जखमी वन्यजीवांवरील उपचारासाठी सुसज्ज वन्यजीव उपचार केंद्र मंजूर व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता.

वन्यजीव उपचार केंद्रात रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे यासारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. याठिकाणी मांसभक्षी प्राणी-पक्षी, तृणभक्षी प्राणी-पक्षी, तसेच जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळ्या पिंजऱ्यांची व्यवस्था असणार आहे. नैसर्गिक अधिवासाशी मिळते जुळते वातावरण तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी वन्यजीवांच्या उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्याची घोषणा केली होती.

सातारा जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी वारंवार पाठपुरावा करून जागेच्या निवडीपासून ते नकाशा तयार करण्यापर्यंत प्रशासनाला सहकार्य केले. खासगी वास्तू विशारद महेंद्र चव्हाण यांनी नकाशे तयार केले. जंगलात वावरणाऱ्या वन्यजीवांवर पाळीव जनावरांच्या दवाखान्यात उपचार केल्यास पाळीव जनावराच्या रोगांची त्यांना लागण होऊ शकते. त्यामुळे वन्यजीवांसाठी वेगळे उपचार करण्याची गरज असते. उपचारावेळी वेगवेगळ्या पद्धतीचे पिंजरे लागतात. तसेच उपचारावेळी वन्यजीवांमध्ये निर्माण होणारा तणाव कमी करण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचा अवलंब करावा लागतो. तो नवीन उपचार केंद्रात होणार आहे.

हेही वाचा : Kolhapur Water Storage : कोल्हापूरकरांनो आपल्याला यंदा पाण्याची काय कमी नाय; मुबलक पाणीसाठा

Last Updated : Apr 2, 2022, 9:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.