ETV Bharat / state

उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत महाबळेश्वरमध्ये 'राष्ट्रवादी युवक'च्या मेळाव्यास सुरुवात

author img

By

Published : Nov 23, 2021, 10:35 PM IST

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण (केडर कॅम्प) शिबीराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.

छायाचित्र
छायाचित्र

सातारा - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण (केडर कॅम्प) शिबीराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार मकरंद पाटील, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते, मात्र, त्यांचा दौरा अचानक रद्द झल्याने अजित पवार यांच्या अनुपस्थितीतच या मेळ्याव्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या निमंत्रित प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर महाबळेश्वरमध्ये होत आहे. या शिबिरास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन, संवाद आणि मंथन यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण आहे. उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. मात्र, त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. या केडर कॅम्पला "चेतना नव्या युगाची नव्या विचारांची प्रगतशील महाराष्ट्राची", असे नाव देण्यात आले आहे.

पक्षाचे विचार युवकांनी पोहचवावेत

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून या भव्य कार्यक्रमाची तयारी गेली काही दिवस सुरु होती. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. मकरंद पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करताना, "छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हे शिबीर होत असल्याचा आनंद केला. ज्या संघटनेत युवकांची मजबूत फळी असते तीच संघटना मजबूत बनते. युवकांनी जिद्दीने काम करून संघटना बांधणीत योगदान द्यावे. राज्यात आपला पक्ष सत्तेवर आहे. उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून अजित पवार महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत असून सरकार करत असलेल्या लोकाभिमुख कामांचे व पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम युवकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी मानले. या केडर कॅम्पच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, नगरसेवक प्रकाश पाटील, शहराध्यक्ष रोहित ढेबे, प्रवीण भिलारे, अॅड. संजय जंगम, दानिश मुलाणी, संदीप मोरे, सचिन ढेबे, अनिकेत रिंगे, तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा - सातारा जिल्हा बँक निवडणूक : सहकार मंत्र्यांची बाजी, गृहराज्यमंत्री पराभूत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.