ETV Bharat / state

विनाकारण फिरणाऱ्यांना चाफ लावण्यासाठी शहराच्या गल्ली-बोळातील रस्ते बंद

author img

By

Published : Apr 10, 2020, 2:03 PM IST

व्यापारी, नागरिकांनी शहरासह तालुक्यातील अत्यावश्यक सेवा तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यापारी, बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. दरम्यान अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्यांंना चाप लावण्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळानीच पुढाकार घेत शहरातील गल्ली-बोळातील रस्ते बंद केले आहेत.

सातारा
सातारा

सातारा - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनांंना अपवाद वगळता पाटण शहरवासियांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. व्यापारी, नागरिकांनी शहरासह तालुक्यातील अत्यावश्यक सेवा तसेच जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यापारी, बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. दरम्यान अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्यांंना चाप लावण्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळानीच पुढाकार घेत शहरातील गल्ली-बोळातील रस्ते बंद केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी नगरपंचायतीच्यावतीने शहरातील महत्त्वाचे रस्ते सर्व वाहनांसाठी बंद केल्यानंतर शहरातील गल्ली-बोळातून दुचाकी वाहनांची वाढलेली संख्या रोखण्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळांनी आपापल्या विभागातील गल्ली-बोळातील रस्ते बंद केले असून अपवाद वगळता शहरातील दुचाकींंच्या वाढलेल्या रहदारीला चाप बसला आहे.

नेहमीच्या तुलनेत शहरातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी १४ एप्रिलपर्यंत नागरिकांची स्वयंशिस्तच या संकटावर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. शहरातील जीवनावश्यक सेवा, किराणा माल दुकाने सुरू असली तरी येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद पाळला असून वाईन शॉप, चिकन-मटण, मच्छिमार्केट, बिअर बार, देशी दारू दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. शासन, प्रशासन पातळीवरून नागरिकांनी आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.