ETV Bharat / state

अभिनव उपक्रम : प्रत्येक शुक्रवारी कराड नगरपालिकेत 'सायकल डे'

author img

By

Published : Dec 18, 2020, 6:08 AM IST

इंधनाची बचत आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कराड नगरपालिकेने हा उपक्रम जाहीर केला आहे. सायकलवरुन न येणार्‍यांची विनावेतन गैरहजेरी लावली जाणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले आहे.

Cycle Day every Friday in Karad Municipality
अभिनव उपक्रम

सातारा - कराड नगरपालिकेने एक अभिनव उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमानुसार दर शुक्रवारी अधिकारी आणि कर्मचारी सायकलवरून नगरपालिकेत येणार आहेत. आज शुक्रवारपासून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.

Cycle Day every Friday in Karad Municipality
कराड नगरपालिकेत 'सायकल डे'

हेही वाचा - India vs Australia: पहिल्या दिवशी भारताच्या ६ बाद २३३ धावा

इंधनाची बचत आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कराड नगरपालिकेने हा उपक्रम जाहीर केला आहे. सायकलवरून न येणार्‍यांची विनावेतन गैरहजेरी लावली जाणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराड नगरपालिकेने देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचे बक्षिस सलग दोन वेळा पटकावले आहे. आता तिसर्‍यांदा बक्षीस पटकावून देशपातळीवरील बक्षिसाची हॅट्ट्रीक करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी नगरपालिका अभिनव उपक्रम राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक शुक्रवारी 'सायकल डे' उपक्रम राबवला जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात कराडकर नागरिकांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे कराडकरसुध्दा नगरपालिकेच्या उपक्रमाला प्रतिसाद देऊन आठवड्यातून एक दिवस सायकलचा वापर करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.