ETV Bharat / state

CM Eknath Shinde : जरांगेंनी उपोषण थांबवताच मुख्यमंत्र्यांनी टाकला सुस्कारा; दोन दिवसांसाठी दरे गावी दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 3:27 PM IST

CM Eknath Shinde : मनोज जरांगेंनी आमरण उपोषण थांबवल्यानं सुस्कारा टाकलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट आपलं गाव गाठलं आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी दुपारी हेलिकॉप्टरनं महाबळेश्वर तालुक्यातील दरेगाव या आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. दोन दिवस ते गावी राहणार आहेत.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

सातारा CM Eknath Shinde : मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर राज्यात झालेल्या उद्रेकामुळं सरकारची दमछाक झाली होती. आता जरांगेंनी आमरण उपोषण थांबवताच मुख्यमंत्र्यांनी थेट आपले गाव गाठलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी हेलिकॉप्टरनं महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावात दाखल झाले आहेत.

सुस्कारा टाकून मुख्यमंत्री गावी दाखल : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलच तापलेलं होतं. मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाची मागणी लावून धरत आमरण उपोषण सुरु केल्यानं सरकारची दमछाक झाली होती. मात्र, शुक्रवारी जरांगेंनी सरकारला आरक्षणासाठी मुदत देत आपलं आमरण उपोषण स्थगित केलं. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. ते गावात दोन दिवस राहणार आहेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले स्वागत : दरेगावातील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं लॅंडींग झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री शिंदे हे सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी आज, उद्या भेटी देणार आहेत. तसंच अनेक महत्वाच्या विषयांवर प्रशासकीय बैठका देखील घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

अतिक्रमणांवर चर्चा होण्याची शक्यता : सध्या महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आहे. प्रशासनानं धडक कारवाई करत अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु, दोन व्यावसायिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं तणाव निर्माण झाला होता. सध्या कारवाई स्थगित ठेऊन स्वतःहून अतिक्रमणं काढून घेण्यास मुदत देण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अडीच महिन्यांनी मुख्यमंत्री महाबळेश्वरात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीर्घ काळानंतर आपल्या मूळगावी आले आहेत. यापूर्वी १० ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर ते दरेगावी आले होते. त्यावेळी त्यांना खराब हवामानाचा फटका बसला होता. पावसामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरला साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर उतरावं लागलं होतं.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut On Eknath Shinde : 'ड्रग्ज प्रकरणाची सूत्रं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का?' राऊतांचा खोचक सवाल
  2. CJI D Y Chandrachud : न्यायालयाचा निर्णय विधानमंडळ थेट रद्द करू शकत नाही, वाटल्यास नवीन कायदा करू शकते : सरन्यायाधीश चंद्रचूड
  3. Maratha Reservation : जरांगे पाटील यांचं उपोषण सोडायला मंत्री गिरीश महाजन गेले असते तर लोकांनी त्यांना मारलं असतं - खडसे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.