ETV Bharat / state

CM Eknath Shinde in Satara : काहीजण देवदर्शनाला लपून-छपून जातात, आम्ही तर उघडपणे जातो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

author img

By

Published : Nov 25, 2022, 8:27 PM IST

( CM Eknath Shinde in Satara ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही ५० जण कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. तुमचे सगळे चांगले झाले की परत देवीच्या दर्शनाला या, असे निमंत्रण तेथील मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. कामाख्या देवी जागृत आहे. त्यामुळे दर्शनाहून परत आल्यावर आणखी इनकमिंग वाढेल.

Etv Bharat
Etv Bharat

सातारा : काहीजण लपून-छपून देव दर्शनाला जातात, पण आम्ही दिवसाढवळ्या जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडमधील पत्रकार परिषदेत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. आमच्या पक्षात इनकमिंग जोरदार आहे. तुम्ही फक्त वर्षावर एक माणूस ठेवा बघायला, अशी कोटी देखील मुख्यमंत्र्यांनी ( CM Eknath Shinde in Satara ) केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना


आसामच्या मुख्यमंत्र्यांचेच निमंत्रण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) म्हणाले की, आम्ही ५० जण कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. तुमचे सगळे चांगले झाले की परत देवीच्या दर्शनाला या, असे निमंत्रण तेथील मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. कामाख्या देवी जागृत आहे. त्यामुळे दर्शनाहून परत आल्यावर आणखी इनकमिंग वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

सीमावाद हा जनतेच्या अस्मितेचा प्रश्न - मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. समितीमधील आमचे मंत्री तेथील लोकांशी चर्चा करून माहिती घेतील. सरकार त्यांच्या प्रश्नांसाठी कुठेही कमी पडणार नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न आमच्या अस्मितेचा असल्यामुळेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आदेशाने बेळगावला जाऊन पोलिसांच्या लाठ्या खाल्लेला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता जे कोणी बोलत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही.


माझ्या सहकार्याबद्दल विरोधी पक्षाला विचारा - कराडमधील कार्यक्रम हे शासकीय प्रोटोकॉलनुसार होते. त्यामुळे अजित पवार यांना डावलण्याचे कारणच नाही. मागील सरकारमध्ये आम्ही एकत्रच होतो. आता तर मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे कुणाला डावलण्याची काय गरज? माझ्या सहकार्याबद्दल आपण माहिती घ्यावी. तुम्ही विरोधी पक्षाला खासगीत विचारले तर माझ्या सहकार्याबद्दल ते सांगतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत - शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. यासंदर्भात मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे की कुणाच्याही अशा विचारांशी आम्ही सहमत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. त्यांच्यासाठी आम्ही काय-काय करतो ते तुम्ही जाणता. आम्ही काही लपवत नाही. उघड भूमिका घेतो. खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि मी माझी भूमिका स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.