ETV Bharat / state

अल्पवयीन मुलाकडून सोने घेऊन फसवणूक; सहा जणांवर गुन्हा

author img

By

Published : Nov 1, 2020, 10:42 PM IST

घरातील दागिने घेऊन ये तुझ्या आईच्या नावाने बँकेत ठेवतो म्हणत मुलाची फसवणूक केली आहे.

सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय
सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय

सातारा - गुरुवार पेठेतील एका अल्पवयीन मुलाचा विश्‍वास संपादन करत घरातील सोने आईच्या नावावर बँकेत ठेवतो, असे सांगून तीन लाख रुपये किंमतीचे सोने व एक दुचाकी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नासिर लतीफ शेख, नौशाद नासिर शेख, तौसीफ नासिर शेख (तिघे रा. वाठार स्टेशन ता. कोरेगाव), अंजुम समीर होडगीकर (रा. रामवाडी, पेण), मुद्दसर बागवान (रा. राजवाडा, सातारा), अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार व संशयित हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी 'तुझ्या वडिलांवर आमचा विश्‍वास नाही, घरातील सगळे सोने तुझ्या आईच्या नावावर बॅंकेत ठेवतो', असे सांगून तक्रारदाराला विश्वासात घेतले. त्याप्रमाणे तक्रादाराने दागिने व दुचाकी संशयितांना नेऊन दिव्यनगरी (ता.सातारा) येथे दिली. सोन्याचे दागीने तक्रारदाराच्या आईच्या नावाने बॅंकेत ठेवतो, असे सांगितले होते. मात्र, संशयितांनी सोने बॅंकेत न ठेवता ते संगनमताने स्वत:कडे ठेवून फसवणूक केली आहे. याबाबतची तक्रार नाजमिन समीर शेख (रा.गुरूवार पेठ,सातारा) याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

हेही वाचा - यशराज इथेनॉल कंपनीचे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी शिवसेनेची निदर्शने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.