ETV Bharat / state

पाटण तालुक्यातील ढेबेवाडीजवळ २२ लाखांचे लाकूड जप्त

author img

By

Published : Jun 30, 2019, 11:28 PM IST

पाटण तालुक्यात बेकायदा वृक्ष तोडप्रकरणी धाडसी कारवाई करत सुमारे २२ लाख रुपये किमतीचे साग व इतर प्रजातींच्या वृक्षाचे लाकूड ताब्यात घेतले आहे.

पाटण

सातारा - वनविभागाच्या फिरत्या पथकाने पाटण तालुक्यात बेकायदा वृक्ष तोडप्रकरणी धाडसी कारवाई करत सुमारे २२ लाख रुपये किमतीचे साग व इतर प्रजातींच्या वृक्षाचे लाकूड ताब्यात घेतले आहे.

ढेबेवाडी येथील राजाराम बेलागडे याच्यावर बेकायदा वृक्षतोड व बेकायदा लाकडांची वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२) ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर संशयितांचा वनाधिकारी शोध घेत आहेत.

पाटण तालुक्यात साग व इतर झाडांची बेकायदा वृक्षतोड झाल्याची माहिती बातमीदारामार्फत वनाधिकाऱ्यांना मिळाली. फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ढेबेवाडी, मानेगाव, शिंबेवाडी व सणबूर येथे तपासणी करण्यात आली. त्यात ढेबेवाडी येथे १ लाख २२ हजार ३०५, मानेगाव येथे १२ लाख २४ हजार ७७, शिबेवाडी येथे ४ लाख ७० हजार २४८ व सणबूर येथे ३ लाख ४ हजार ९६८ रुपयांचे लाकूड ताब्यात घेण्यात आले. कोणतीही परवानगी न घेता साग व इतर प्रजातीच्या सुमारे ७०० वृक्षांची बेकायदा तोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. २६४ घनमीटर इतका हा लाकूडसाठा वनविभागाने पकडला. ही कारवाई उपवनसंरक्षक डाॅ.भारतसिंह हाडा, विभागीय वनाधिकारी प्रकाशराव बागेवाडी यांनी केली.

Intro:सातारा : वनविभागाच्या फिरत्या पथकाने
पाटण तालुक्यात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी धाडसी कारवाई करत सुमारे २२ लाख रुपये किंमतीचे साग व इतर प्रजातींच्या वृक्षाचे लाकूड ताब्यात घेतले आहे.Body:ढेबेवाडी येथील राजाराम बेलागडे याच्यावर बेकायदा वृक्षतोड व बेकायदा लाकडांची वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२) ब नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. अन्य संशयितांचा वनाधिकारी शोध घेत आहेत.
पाटण तालुक्यात साग व इतर झाडांची बेकायदा वृक्षतोड झाल्याची माहिती बातमीदारामार्फत वनाधिका-यांना मिळाली. फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे व त्यांच्या सहका-यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ढेबेवाडी, मानेगाव, शिंबेवाडी व सणबूर येथे तपासणी करण्यात अाली. त्यात ढेबेवाडी येथे १ लाख २२ हजार ३०५, मानेगाव येथे १२ लाख २४ हजार ७७, शिबेवाडी येथे ४ लाख ७० हजार २४८ व सणबूर येथे ३ लाख ४ हजार ९६८ रुपयांचे लाकूड ताब्यात घेण्यात आले. कोणतीही परवानगी न घेता साग व इतर प्रजातीच्या सुमारे ७०० वृक्षांची बेकायदा तोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. २६४ घनमिटर इतका हा लाकूडसाठा वनविभागाने पकडला.

ही कारवाई उपवनसंरक्षक डाॅ.भारतसिंह हाडा, विभागीय वनाधिकारी प्रकाशराव बागेवाडी यांनी केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.