ETV Bharat / state

'तोडेंगे दम मगर साथ ना छोडेंगे', अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 5, 2022, 6:18 PM IST

दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला असून एक मित्र जखमी झाल्याची घटना जत तालुक्यातील बिरनाळ येथे घडली आहे. हे सर्व जण एकाच दुचाकीवरून चौघे गावी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

मित्र
मित्र

सांगली - दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला असून एक मित्र जखमी झाल्याची घटना जत तालुक्यातील बिरनाळ येथे घडली आहे. हे सर्व जण एकाच दुचाकीवरून चौपलसीट गावी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. जत तालुक्यातील कोसारी येथील विजयपूर गुहागार राष्ट्रीय महामार्गावर एक दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. अजित नेताजी भोसले (वय 21 वर्षे), मोहित शिवाजी तोरवे (वय 21 वर्षे) आणि राजेंद्र भाले ( वय 22 वर्षे), अशी मृत मित्रांची नाव आहेत. संग्राम विक्रम तोरवे (वय 16 वर्षे) हा जखमी झाला आहे.

शनिवारी (दि. 4 जून) दुपारी अजित भोसले हा आपल्या तीन मित्रांसमवेत एकाच मोटरसायकलवरून जत येथे गेला होता. दरम्यान, रात्री उशिरा अजित भोसले पुन्हा आपल्या दुचाकीवरुन तिघा मित्रांच्या समवेत चौघे कोसारी येथे परतत होते. बिरनाळ जवळ असणाऱ्या ओढा पात्रानजीक आले असता धोकादायक वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने वाहन घसरले. यात अजित भोसलेचा जागीच मृत्यू झाला तिघा जखमींना ग्रामस्थांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारावेळी मोहित तोरवे, राजेंद्र भाले या दोघांचा मृत्यू झाला. संग्राम तोरवेवर उपचार सुरू आहेत. एकाच वेळी तिघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.