ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यातील पूर स्थितीची मुख्यमंत्री करणार पाहणी

author img

By

Published : Aug 1, 2021, 10:18 PM IST

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (2 ऑगस्ट) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई - सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी (2 ऑगस्ट) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कोल्हापूर विमानतळावर सकाळी 9.50 वाजता आगमन होईल. यापूर्वी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला आहे. तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा खराब हवामानामुळे रद्द करावा लागला होता.

असा असेल सांगली दौरा

  • सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता. पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.
  • सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता. पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.
  • सकाळी 11.55 वा. कसबे डिग्रज येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
  • दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
  • दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
  • दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
  • दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद.
  • दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पस येथे आगमन व राखीव.
  • दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

हेही वाचा - राज्यात ६ हजार ४७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १५७ रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.