ETV Bharat / state

सांगलीत ऊस दर आंदोलनाची ठिणगी, एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक

author img

By

Published : Nov 18, 2019, 5:41 PM IST

कडेगाव येथील वांगी नजीकच्या चव्हाणवाडी व पलूस तालुक्यातील आंधळी फाटा येथून ऊस वाहतूक चालू असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी समजली. त्यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोहोचत कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून धरत ट्रॅक्टरमधील हवा सोडून दिली.

एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक

सांगली - ऊस आंदोलनाची ठिणगी सांगलीत पडली आहे. एक रक्कमी एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले आहे. पलूस आणि कडेगाव तालुक्यातील ऊस वाहतूक रोखत, ट्रॅक्टरची हवा आंदोलकांनी सोडली.

एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी आक्रमक

हेही वाचा - सांगलीत रस्त्यालगत खोदलेल्या चरीत अडकला रानटी गवा; जेसीबीच्या साहाय्याने सुखरुप सुटका

कडेगाव येथील वांगी नजीकच्या चव्हाणवाडी व पलूस तालुक्यातील आंधळी फाटा येथून ऊस वाहतूक चालू असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी समजली. त्यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोहोचत कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून धरत ट्रॅक्टरमधील हवा सोडून दिली.

हेही वाचा - राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी; खासदार संजय पाटलांचा भाजपला घरचा आहेर

कोल्हापूर जिल्ह्यात सर्व साखर कारखाने बंद आहेत. तसेच 23 नोव्हेंबरला कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये पार पडणाऱ्या ऊस परिषदेमध्ये एफआरपीबाबत निर्णय होणार असल्याने, तोपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ न देण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे एफआरपी ठरल्याशिवाय सांगली जिल्ह्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार, नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिला आहे.

Intro:File name - mh_sng_02_uas_andolan_vis_01_7203751 - to -
mh_sng_02_uas_andolan_img_05_7203751

स्लग - ऊस आंदोलनाची ठिणगी,ऊस वाहतूक रोखून,सोडली ट्रॅक्टरची हवा.स्वाभिमानीने रस्त्यावर उतरत सुरू केले आंदोलन...

अँकर - सांगलीत ऊस आंदोलनाची ठिणगी पडली आहे.एक रक्कम एफआरपीच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले आहे.पलूस आणि कडेगाव तालुक्यातील ऊस वाहतूक रोखत,ट्रॅकटरची हवा सोडली आहे.
विटा नजीकच्या उदगीरी शुगर साखर कारखान्यासाठी ही ऊस वाहतूक सुरू होती.कडेगाव येथील वांगी नजीकच्या चव्हाणवाडी व पलूस तालुक्यातील आंधळी फाटा येथून ही ऊस वाहतूक चालू असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी समजताच त्यांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपटराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पोहोचत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून यावेळी ट्रॅक्टर मधील चाकाची हवा सोडून दिली.कोल्हापूर जिल्ह्यात सर्व साखर कारखाने बंद आहेत.आणि 23 नोव्हेंबरला कोल्हापूरच्या जयसिंगपूर मध्ये पार पडणाऱ्या ऊस परिषदेमध्ये एफआरपी बाबत निर्णय होणार असल्याने,तोपर्यंत एकही साखर कारखाना सुरू होऊ न देण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आला आहे,त्यामुळे एफआरपी ठरल्याशिवाय सांगली जिल्ह्यातीलही एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिला आहे.


Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.