ETV Bharat / state

Weightlifter Kajal Sargar : रौप्यपदक विजेता संकेत सरगरची बहिण काजल देखील आहे राष्ट्रीय वेटलिफ्टर

author img

By

Published : Aug 3, 2022, 5:55 PM IST

संकेत सरगर या वेटलिफ्टरने भारताला कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिलं रौप्य पदक मिळवून ( Weightlifter sanket Sargar ) दिले. त्याच्या या चमकदार कामगिरीने सांगलीलाचं नव्हे तर संपूर्ण भारतीयांना देखील अभिमान वाटत आहे. अत्यंत गरीब कुटुंबातल्या संकेतने मिळवलेलं यश दैदिप्यमान आहे. विशेष म्हणजे त्याची लहान बहिण देखील राष्ट्रीय वेटलिफ्टर आहे. नुकतंच तिने "खेलो इंडिया युथ गेम्स"मध्ये सुवर्णपदक पटकावलं, तिचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले होते.

Weightlifter Kajal Sargar
काजल सरगर

सांगली: सांगली शहरातल्या संजयनगर येथील राहणारे महादेव आणि राजश्री सरगर या दांपत्याला तीन मुलं आहेत, संकेत, काजल आणि जीवन. यापैकी संकेत ( Silver medalist Sanket Sargar ) आणि काजल या दोघांना खेळाची प्रचंड आवड आहे. त्यातूनच त्यांनी वेटलिफ्टिंग हा प्रकार निवडला. शहरातल्या कल्पतरू व्यायाम मंडळ येथे मयूर सिंहासने यांच्याकडे दोघा बहिण भावंडांनी वेटलिफ्टिंगचे धडे घेतले. बहिण-भावांनी आपल्या आई-वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून केल्याला मेहनतीला फळ मिळवून दिले आहे. मोठा भाऊ असणाऱ्या संकेतने आंतरराष्ट्रीय पातळीवर तर याआधी लहान बहीण असणाऱ्या काजलने राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे.



काजलचे ( National Weightlifter Kajal Sargar ) वडील हे पान टपरी चालवतात तर तिथेच आई चहा आणि भजीचा गाडा चालवते. दोघेही नवरा बायको पान टपरी आणि चहा-नाष्टा व्यवसायातून आपला घर-प्रपंच चालवतात. याचं जोरावर त्यांनी संकेत आणि काजलचा इथपर्यंत शिक्षण पूर्ण केले.काजल सध्या बारावीमध्ये आहे. कस्तुरबा वालचंद कॉलेजमध्ये सायन्स विभागात शिक्षण घेत आहे. घराजवळच असणाऱ्या विविध बर्वेमध्ये पहिले ते पाचवी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पाचवी ते दहावी शहराच्या दडगे गर्ल्स हायस्कूल मध्ये शिक्षण झाले.



काजलचे वडील महादेव सरगर सांगतात, सांगलीतील मधुरा सिंहासने आणि मयूर सिंहासने या दोघा बहीण-भावांनी वेटलिफ्टिंग मध्ये केलेली कामगिरी ही आपल्या डोळ्यासमोर होती. त्याप्रमाणेच आपल्या मोठ्या मुलाने आणि मुलीने कामगिरी करावी असे ध्येय होते. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या के. मल्लेश्वरीचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर होता. ती देखील अत्यंत गरीब परिस्थितीतून ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहचली होती.

आपली मुलगी ही तशीच कामगिरी करेल असा विश्वास होता. त्यातूनच प्रेरणा घेतली आणि प्रोत्साहन दिले. मात्र तिला प्रशिक्षणाचे सर्व धडे नाना सिंहासने आणि त्यांचे चिरंजीव मयूर आणि मुलगी मधुरा सिंहासने या दोघांनी दिले. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता त्याच्या शिक्षणामध्ये आम्ही कमी केली नाही. पैशाची परिस्थिती तशी फार चांगली नव्हती, मात्र प्रशिक्षकांनी वेळोवेळी त्यासाठी हातभार लावला. त्यामुळे काजलने खेलो इंडिया यूथ गेम्सपर्यंत मजल मारली आणि सुवर्णपदक पटकावले. आतापर्यंत काजलने दोन राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ( National level weightlifting competition ) विजेतेपद मिळवले आहे.

हेही वाचा - Weightlifter Sanket Sargar : उदरनिर्वाहासाठी पैसे नसतानाही वडिलांनी ट्रेनिंग सुरु ठेवले; संकेतच्या बहिणीने सांगितला संघर्षमय अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.