ETV Bharat / state

शिराळा तालुक्यात अवैध दारूसाठ्यासह 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Mar 7, 2020, 3:17 PM IST

शिराळा तालुक्यातील शिरशी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारूसाठ्यासह सुमारे १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Shirala police taken action Illegal alcohol stocks seized
शिराळा पोलीस अवैध दारूसाठा जप्त

सांगली - शिराळा तालुक्यातील शिरशी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारूसाठ्यासह सुमारे १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिराळा पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी प्रफुल्ल बाबर, सुनील वसंतताने (रा. मलकापूर, ता.कराड) आणि राजेंद्र भोसले या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिरशी येथे शिराळा पोलिसांची कारवाई.. अवैध दारूसाठ्यासह 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा... संतापजनक! अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, नराधम शिक्षकाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराळा पोलिसांना माहितीगाराकडून शिरशी येथील राजेंद्र भोसले याच्याकडे अवैध दारु आणण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका चारचाकी गाडीतून (क्रमांक एम.एच. ०६ ए.एल. ४७८४) सुनील वसंतताने याच्या मालकीची २८ हजार ८०० रुपये किंमतीची दारू पकडली गेली.

दारू वाहतूक करणारे वाहन व अवैध दारू, असा एकूण १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध दारुविक्रीवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा... कुंपणच खातंय शेत, पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानाच्या गावाला भ्रष्टाचाराची किड...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.