ETV Bharat / state

Gopichand Padalkar On Sharad Pawar : शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं; गोपीचंद पडळकरांची टीका

author img

By

Published : Nov 13, 2022, 9:57 PM IST

Updated : Nov 13, 2022, 10:27 PM IST

गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी शरद पवारांवर टीका ( Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar ) केली आहे. राष्ट्रवादीला अडीच ( Nationalist Congress ) वर्षात सत्तेची सूज आली होती. सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली असल्याचे ते म्हणाले.

Padalkar On Sharad Pawar
Padalkar On Sharad Pawar

सांगली - तुम्ही राज्यात अनेक घरे फोडली, त्यामुळे तुम्ही जे पेरले तेच आता उगवत आहे, अशू शब्दात भाजपांतर गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी शरद पवारांच्यावर घणाघात ( Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar ) केला. त्याचबरोबर शरद पवाराच्या घरात उभी फूट पडते का? असे संपूर्ण राज्यात वातावरण झाले आहे. असे मत आमदार पडळकर यांनी व्यक्त केले आहे, सांगलीमध्ये आयोजित भाजप मेळाव्यात ते बोलत होते.

शरद पवारांनी जे पेरले तेच उगवत आहे - गोपीचंद पडळकर

राष्ट्रवादीच्या पोटात आता दुखत आहे - तसेच राष्ट्रवादीला ( Nationalist Congress ) अडीच वर्षात सत्तेची सूज आली होती. सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली आहे.तर राष्ट्रवादीच्या पोटात आता दुखत आहे, पण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे चुन्याची गोळी असून, त्यांना ही चुन्याची गोळी दिली की त्यांची पोटदुखी बरी होईल,असा टोला लगावात, सांगली जिल्हा बँकेचा गैरवापर करून भाजपच्या लोकांना त्रास दिला. राष्ट्रवादी हा पक्ष जिल्हा बँकेच्या जीवावर चालत आहे. त्यामुळे यांचे पाळेमुळे या बँकेत आहेत, ती उखडून टाकली पाहिजे. त्यामुळेच मी या बँकेच्या कारभारा विरोधात तक्रार केल्याचे,आमदार गोपीचंद पडळकर ( MLA Gopichand Padalak ) यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Nov 13, 2022, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.